लाडकी बहीण योजना घराघरात पोहचवा..उपनेत्या सौ विजयाताई पोटे

 

लाडकी बहीण योजना घराघरात पोहचवा..उपनेत्या सौ विजयाताई पोटे 

♦️गरताड येथे महाविजय संवाद मुख्यमंत्री लाडकी बहिण योजना संपर्क अभियान कार्यक्रम संपन्न

चोपडा,दि.१(प्रतिनिधी) : महिलांचे हात मजबूत करण्यासाठी मुख्यमंत्री एकनाथराव शिंदे साहेबांनी लाडकी बहीण योजनेच्या माध्यमातून मोलाचा हात दिला असून महिला स्वावलंबनासाठी  जोरदार नियोजन सुरू आहे तसेच बचत गटांच्या माध्यमातून महिला सक्षमीकरणासाठी जलद गतीने प्रयत्न सुरू असल्याची माहिती लाडकी बहीण मुबंई शिवसेना उपनेत्या सौ विजयाताई पोटे हयांनी गरताड येथे  महाविजय संवाद मुख्यमंत्री लाडकी बहिण योजना संपर्क अभियान कार्यक्रमप्रसंगी दिली.यावेळी आमदार लताताई चंद्रकांत सोनवणे , सुष्माताई रसाळ (महिला शहर प्रमुख अंबरनाथ), सरिताई कोल्हे ( जिल्हाध्यक्ष महिला आघाडी ) यांनी मार्गदर्शन केले.

 यावेळी मंगलाताई पाटील( महिला आघाडी  तालुका प्रमुख ), नामदे पाटील लाडकी बहिण योजना अध्यक्ष, विकासभाऊ पाटील सदस्य लाडकी बहिण योजना, गोरख कोळी सदस्य लाडकी बहिण योजना,  नरेंद्र पाटील सभापती कृ.उ.बा. स. चोपडा , शिवराज पाटील संचालक, किरण देवराज संचालक, दशरथ कोळी, प्रदीप बारी, राजुसर अशोक जाधव, नितीन पाटील,राजु पाटील, वाल्मीक कोळी सरपंच, मच्छिंद्र पाटील कुरवेल, मुकेश कोळी, तुषार पाटील तसेच शिवसेनेचे पदअधिकारी कार्यकर्ते व गावातील ग्रामस्थ तसेच परिसरातील महिला उपसथित होत्या*.

Post a Comment

थोडे नवीन जरा जुने