समाजकार्य महाविद्यालयात रोटरी क्लब ऑफ चोपडा च्या संयुक्त विद्यमानाने ताण तणाव मुक्त / कॉपी मुक्त परीक्षा अभियान कार्यशाळेचे आयोजन

 समाजकार्य महाविद्यालयात रोटरी क्लब ऑफ चोपडा च्या संयुक्त विद्यमानाने ताण तणाव मुक्त / कॉपी मुक्त परीक्षा अभियान कार्यशाळेचे आयोजन

चोपडा दि.१(प्रतिनिधी):कवयित्री बहिणाबाई चौधरी उत्तर महाराष्ट्र विद्यापीठ जळगाव , भगिनी मंडळ संचालित समाजकार्य महाविद्यालय चोपडा जिल्हा जळगाव विद्यार्थी विकास विभाग व रोटरी क्लब चोपडा यांच्या संयुक्त विद्यमाने *"ताण - तणाव मुक्त / कॉपी मुक्त परीक्षा अभियान कार्यशाळा"* आयोजित करण्यात आली.  या कार्यशाळेचे उद्घाटन महाविद्यालयाचे प्राचार्य तथा रोटरीचे अध्यक्ष डॉ. ईश्वर सौंदाणकर व रोटरी क्लब चोपडाचे प्रकल्प प्रमुख डॉ. वाघजाळे सर  हस्ते निसर्गपूजनाने करण्यात आले.परीक्षा आणि विद्यार्थ्यावर येणारा ताण यांचे संयोजन करण्याच्या हेतूने महाविद्यालयातील प्राचार्य डॉ. ईश्वर सौंदाणकर व  उपप्राचार्य डॉ. आशिष गुजराथी यांच्या  मार्गदर्शनातून सदरील कार्यशाळा पार पडली. 

या कार्यशाळेत परीक्षा विभागाचे प्रमुख  डॉ. विनोद रायपुरे यांनी प्रास्ताविकेत कार्यशाळेचे महत्त्व व उद्देश स्पष्ट करून सांगितले. 

कार्यशाळेतील प्रमुख मार्गदर्शक डॉ. प्रा. डॉ. आर. आर.पाटील यांनी परीक्षा काळातील ताण वेळीच कसा हाताळावा, हे प्रासंगिक उदाहरण देऊन सांगितले. ताण हा मानवाच्या जीवनातील अविभाज्य घटक असून ताणाचे रूपांतरण तणावात होण्याआधीच त्याचे व्यवस्थापन होणे गरजेचे असते. याशिवाय कॉपी न  करता परीक्षा देण्यासाठी प्रेरित केले. विद्यार्थ्यांनी अभ्यास, योगा,आणि वेळेचा सदूपयोग याद्वारे ताण तणावाचे व्यवस्थापन करावे हे त्यांनी सांगितले.

कार्यशाळेतील अध्यक्ष डॉ. ईश्वर सौंदाणकर यांनी परीक्षा काळात विद्यार्थी गोंधळून जातो. त्यातून ताण-तणाव निर्माण होतो. त्यासाठी सकारात्मक विचार व वेळेचे विषयावर नियोजन केल्यास परीक्षा सहज सुलभ बनते.तसेच कॉपी प्रकारातून विद्यार्थ्यांचे कसे नुकसान होते हे उदाहरण देऊन सांगितले. उपप्राचार्य डॉ. आशिष गुजराथी यांनी कॉपी मुक्त परीक्षासाठी आव्हाहन करत शुभेच्छा दिल्या.

कार्यशाळेच्या यशस्वीतेसाठी श्री. अमोल गुजराथी, अजय बारी,अजय भाट, देवेंद्र पाटील यांचे मोलाचे सहकार्य लाभले. कार्यक्रमाचे सूत्रसंचालन विद्यार्थी विकास अधिकारी प्रा नारसिंग वळवी यांनी केले. तर आभारप्रदर्शन महिला सहाय्यक विद्यार्थी विकास अधिकारी डॉ. मोहिनी उपासनी  यांनी केले. कार्यक्रमाच्या  प्रसंगी महाविद्यालयातील ग्रंथपाल प्रा कल्पना सोनवणे , सौ रुपाली देसाई  डॉ. अनंत देशमुख, डॉ संबोधी देशपांडे, डॉ. मारोती गायकवाड, डॉ. उत्तम सोनकांबळे, डॉ, राहुल निकम तसेच बहुसंख्य विद्यार्थी उपस्थित होते.

Post a Comment

थोडे नवीन जरा जुने