चोपड्यात धुम स्टाईल सोन्याची मंगलपोत चोरी.. महिला वर्गात भिती
चोपडा दि.१७(प्रतिनिधी): चोपडा शहरात धूम स्टाईल चोरीच्या घटना दिवसेंदिवस वाढत असून काल गौतम नगर भागात महिलेची मंगल पोत घेऊन चोरटे पसार झाल्याने सर्वत्र खळबळ उडाली आहे.जवळपास १७ ग्रम वजनाची ८०,०००हजार रुपयांचा ऐवज पोबारा केल्याची नोंद पोलिस डायरीत झाली आहे.या प्रकाराने महिला वर्गात प्रचंड भिती निर्माण झाली असून पोलिसांनी कठोर पाऊले उचलण्याची मागणी जोर धरू लागली आहे.
काल,दिनांक 16 रोजी सायंकाळी 06.45 ते 07.00 वा. चे सुमारास चोपडा शहरात गौतम नगर भागात मातोश्री बिल्डीग विशाल सलुन जवळ रोडवर 28ते 30 वयोगटातील 2 युवकांनी त्याचा कडील विना क्रमांकाची पल्सर मो.सा.ने फिर्यादी हे पायी पायी रोडने जात असतांना त्यांचे समोरुन येवुन फिर्यादी सौ आशा प्रल्हाद बिऱ्हाडे यांनी गळ्ळ्यात परीधान केलेली 80,000/- रु.कि.ची 17 ग्रॅम वजनाची दोन सरी असलेली तिस दोन सोन्याच्या वाट्या असलेली मंगल पोत ही जबरदस्तीने तोडून जबरी चोरी करुन घेवुन गेले म्हणून चोपडा शहर पोलिस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आला आहे पुढील तपास पोलीस निरीक्षक मधुकर सावळे यांचा मार्गदर्शनात उप निरीक्षक जितेंद्र वल्टे करत आहे