चोपडा नगरपालिकेस भुयारी गटार योजनेचा स्वहिस्सा भरणेसाठी वैशिष्टयपूर्ण योजनेअंतर्गत रु. २० कोटींचे अनुदान मंजूर ... आ. सौ.लताताई सोनवणे व माजी आ.प्रा.चंद्रकांत सोनवणे यांच्या पाठपुराव्यास यश

 चोपडा नगरपालिकेस भुयारी गटार योजनेचा स्वहिस्सा भरणेसाठी वैशिष्टयपूर्ण योजनेअंतर्गत रु. २० कोटींचे अनुदान मंजूर ...  आ. सौ.लताताई सोनवणे व माजी आ.प्रा.चंद्रकांत सोनवणे यांच्या पाठपुराव्यास यश

   

  चोपडा दि.१७(प्रतिनिधी)शहराची लोकसंख्या सद्यस्थितीत ८६००० असुन सुमारे २२००० रहिवासी व वाणिज्य मालमत्ता आहेत. भविष्यात शहरातील लोकसंख्येद्वारे अंदाजे १९.५० दश लक्ष लिटर सांडपाणी निर्माण होणार आहे. सदर सांडपाण्यावर प्रक्रिया करुन त्यातील स्वच्छ पाणी नदीत सोडणे ही पर्यावरण संवर्धन, प्रदूषण नियंत्रण व रोगराई प्रतिबंधास यासाठी काळाची गरज आहे.  सदर सांडपाणी शुद्धीकरण (STP) केंद्रातून उपलब्ध होणारे प्रक्रिया केलेले पाणी हे महाराष्ट्र प्रदूषण नियंत्रण मंडळाच्या सुधारित मानांकनाप्रमाणे प्रक्रिया करणेत येणार असुन त्यामुळे रत्नावती नदीचे पुनरुज्जीवन होण्यास मदत होणार आहे.चोपडा शहरसाठी भुयारी गटार व त्याद्वारे वाहून जाणारे अशुद्ध पाण्यावर प्रक्रिया करणारी योजना  दोन टप्यात मंजूर झाले असून पहिल्या टप्प्यात महाराष्ट्र सुवर्ण जयंत नगरोत्थान महाअभियान (राज्यस्तर) योजने अंतर्गत दि. ०३ ऑक्टोबर २०२३ रोजीच्या शासन निर्णयाद्वारे रु. ८५. ६७ कोटी रकमेच्या प्रस्तावास प्रशासकीय मान्यता प्राप्त झालेली असून हे काम प्रगती पथावर आहे . 

         तसेच सदर सांडपाणी व्यवस्थापन योजनेच्या दुस-या टप्प्यात मंजुर झालेल्या एकुण रु. ५५.०५ कोटी निधीपैकी केंद्रशासनाचे रु.११.६८ कोटी तर राज्यशासनाचे रु.२०.६४ कोटी अनुदानाचा अंतर्भाव असुन नगरपरिषद स्वहिस्सा रु. ५.१६ कोटी व अतिरिक्त हिस्सा रु. १६.४३ कोटी असा एकुण रु. २१.५९ कोटी इतका आहे. नगरपरिषदेस सदरचा स्वहिस्सा व अतिरिक्त हिश्यापोटी रु. २१.५९ कोटी योजनेखाती भरणे आवश्यक होते परंतु नगरपरिषदेची आथिऀक परिस्थिती पाहता हे शक्य होणारे नव्हते.             

        नगरपरिषदेपुढे भविष्यात सदर योजनेच्या दुस-या टप्प्यातील काम पुर्ण करतेवेळी मोठा आर्थिक बोजा निर्माण होणार होता याचा विचार करून आ. सौ .  लताताई चंद्रकांत सोनवणे यांनी महाराष्ट्राचे मुख्यमंत्री मा. ना .श्री एकनाथरावजी शिंदे  यांच्याकडे दि : - ०६/०८/२०२४ रोजी नगरपालिकेवर आर्थिक बोजा पडू नये म्हणून रुपये  २१.५९ कोटी इतक्या निधीची मागणी केलेली होती त्यानुसार नगरविकास विभाग यांचेकडील दि. ०७ ऑक्टोबर २०२४ रोजीच्या शासन निर्णया नुसार नगरपरिषदांना वैशिष्टयपूर्ण कामासाठी विशेष अनुदान या योजनेअंतर्गत नगरपरिषद  स्वहिस्सा भरणेकामी रु. २० कोटी निधी मंजुर करणेत आलेला आहे. 

     यासाठी आमदार  सौ . लताताई चंद्रकांत सोनवणे यांच्या प्रयत्नांमुळे नगरपरिषदेवरील २० कोटींचा  आर्थिक भार कमी होणेस मदत होणार असून सदर योजनेचे काम पुर्णत्वास येण्यातील मोठा अडथळा याद्वारे दूर झालेला आहे.   

      याप्रसंगी आ. सौ. लताताई चंद्रकांत सोनवणे व माजी आ. प्रा. चंद्रकांत सोनवणे यांनी मुख्यमंत्री एकनाथजी शिंदे  , उपमुख्यमंत्री देवेंद्रजी फडणवीस  , उपमुख्यमंत्री अजीतदादा पवार , ग्रामविकास मंत्री  गिरिशजी महाजन , जळगांव जिल्ह्याचे पालकमंत्री गुलबरावजी पाटील ,तसेच मदत व पुनर्वसन मंत्री अनिलदादा पाटील यांचे आभार मानले .







Post a Comment

थोडे नवीन जरा जुने