सत्कृत्यानेही भगवंताला प्राप्त करणे शक्य... ह.भ.प.पांडुरंग महाराज घुले
चोपडा दि.१६ (प्रतिनिधी) :----कान्ह या रे जगजेठी ! देई भेटी एक वेळे या अभंगाचे विवेचन करतांना ते म्हणाले, कान्हा आता उशीर नको लावू, त्वरा कर आणि मला येऊन भेटी दे, तुझे दर्शन दे आणि एकदाचे मला या संसाराच्या पाशातून मुक्त कर.मी तूझ्या भेटीची, सेवेची वाट पाहतेय. सत्कृत्याने देखील भगवंत प्राप्त होतो.भगवत भक्ती जर प्रामाणिक असेल तर भागवत प्राप्ती देखील शक्य असल्याचे प्रतिपादन हभप पांडूरंग महाराज घुले यांनी तावसे बु!! तालुका चोपडा येथे
वैकुंठवासी अमृत काशीराम चौधरी व वैकुंठवासी ग भा मंदोदरी अमृत चौधरी यांच्या पुण्यस्मरणानिमित्त आयोजित तीन दिवसीय कीर्तन महोत्सवाचे आयोजन ह. भ. प नरहरी महाराज चौधरी सचिव वारकरी महामंडळ महाराष्ट्र यांनी केले होते त्या प्रसंगी ते बोलत होते.
वारकरी संप्रदाय संतानुमोदीत अशी एक वैचारिक व सकल समाज उद्धारक मार्गदर्शक अशी परंपरा आहे. या वारकरी संप्रदायाचे महाराष्ट्रातील अनेक जाती धर्माचे अनुयायी या परंपरेमध्ये आपल्या जीवनाला सुख आणि शांतीच्या मार्गाचा अवलंब करून वाटचाल करत आहेत.एक संस्कारक्षम व सदा आपापल्या उद्योगांमध्ये रत ठेवणारी अशी आदर्शवत परंपरा असून या परंपरेमध्ये पाईकत्व स्वीकारून आपल्या जीवनाला एक प्रकारची शांत आणि सुखरूपता निर्माण करून संसारी जीवनाबरोबर पारलौकिक जीवनही सुखकर करण्यारी विचार प्रणाली आहे., म्हणून खूप असा परिवार व्यक्तिगत जीवन, कौटुंबिक जीवन या परंपरेमध्ये आपलं योगदान देत आहेत. याच परंपरेमध्ये रत असणारे वैकुंठवासी अमृत काशीराम चौधरी व वैकुंठवासी मंदोदरी अमृत चौधरी या उभयतांचा पुण्यस्मरण सोहळा जळगाव तालुका चोपडा तावसे बुद्रुक येथे तीन दिवसीय संपन्न होत असताना श्रीक्षेत्र आळंदी येथून व महाराष्ट्रातून काही कीर्तनकार मंडळी या ठिकाणी उपस्थित राहून कार्यक्रम अतिशय छान पद्धतीने संपन्न करण्यात आला .
या तीन दिवसीय कीर्तन महोत्सवात / सप्ताहामध्ये प्रथम दिवशी भरत महाराज पाटील यांचे कीर्तन झाले त्यांनी मरणा हाती सुटली काया ! विचारे या निश्चये!! हया अभंगाचे विवेचन केले . दुसऱ्या दिवशी पारस महाराज जैन चाळीसगावकर यांचे कीर्तन झाले त्यांनी पुण्यवंत व्हावे , घेता सज्जनांची नावे!! या अभंगाचे विवेचन केले.
सदर *त्रि दिवसीय कीर्तन महोत्सवाचा समारोप काल्याच्या कीर्तनाने हभप परमपूज्य पांडुरंग महाराज घुले ( अध्यक्ष - गाथा मंदीर देहू , पुणे ) यांच्या काल्याच्या कीर्तनाने भगवान श्रीकृष्णाचा महत्त्व सांगत आणि भगवतप्राप्तीची उपलब्धी याच मानवी जीवनामध्ये होऊ शकते म्हणून आपण किती लक्ष देत दक्ष होऊन भगवत भक्ती करून भगवत प्राप्ती या विषयाचे अनुसंधारात्मक स्थितीचा अवलंब करणे आणि आपले जीवन कृतार्थ करणे हेच महत्त्व मानवी जीवनामध्ये आहे अशी खूप छान पद्धतीने मांडणी करत संपूर्ण उपस्थित समाजाला आपल्या ज्ञानाच्या माध्यमातून उपकृत केले .
सदर त्रि दिवसीय कीर्तन महोत्सवास विश्वनाथ महाराज कोल्हे , गोविंद महाराज चौधरी , रामचंद्र महाराज सारंग ( गायानाचार्य ) , जनार्दन महाराज पाटील ( मृदुंगाचार्य ) , विश्वनाथ महाराज पाटील ( गायनाचार्य ) , रोहित महाराज पाटील ( मृदुंगाचार्य ) , गायनाचार्य - वारकरी संप्रदायाचे भीमसेन बाबा महाराज गोडसे , किरण महाराज पाटील , सुनील महाराज पाटील , तुळशीराम महाराज गरड , योगेश महाराज पांडव , वासुदेव अण्णा पाटील कुरवेल, जगन्नाथ महाराज तावसे बु!! गजानन महाराज चौगावकर आदी उपस्थित होते.कुरवेलकर मंडळी व संपूर्ण गावाची मंडळी तसेच पंचक्रोशीतील मंडळी उपस्थित राहून या कार्यक्रमाचा आनंद घेत कार्यक्रमाची शोभा वाढवली.
समारोपप्रसंगी संपूर्ण उपस्थित मंडळीला व गावकरी मंडळीला महाप्रसादाने समारोप करण्यात आला . या संपूर्ण कार्यक्रमाचे आयोजन अशोक अमृत चौधरी व धनराज अमृत चौधरी यांनी केले होते....