भाजपाच्या पहिल्या यादीत जळगाव जिल्ह्यात गिरीष महाजन,राजुमामा भोळे, संजय सावकारे, अमोल जावळे, मंगेश चव्हाण यांच्या नावावर शिक्कामोर्तब
जळगाव दि.20(प्रतिनिधी)महाराष्ट्रातील विधानसभा निवडणुकीसाठी भाजपाने पहिली यादी जाहीर केली असून त्यात 99 उमेदवारांना संधी देण्यात आली आहे. भुसावळात भाजपाचे आमदार संजय सावकारे तर जळगावात आमदार राजूमामा भोळे तर रावेरात अमोल जावळे यांना संधी देण्यात आली आहे. तसेच जामनेर मधून गिरीशभाऊ महाजन यांना पुन्हा संधी मिळाली आहे.तर चाळीसगाव मधून मंगेश चव्हाण यांच्या नावावर शिक्कामोर्तब झाला आहे.भाजपाने पहिल्या यादीत ९९उमेदवारांची वर्णी लागली आहे. त्यात खान्देशातून• नंदुरबार - विजयकुमार गावीत ,शहादा- राजेश पाडवी,धुळे- अनुप अग्रवाल,शिंदखेडा- जयकुमार रावल,शिरपूर- काशीराम पावरा यांची वर्णी लागली आहे.
जळगावात आमदार भोळे यांना पुन्हा उमेदवारी जळगावचे आमदार राजूमामा भोळे यांना पुन्हा एकदा जळगाव शहर मतदारसंघातून उमेदवारी मिळाली आहे. आमदार राजूमामा भोळे यांनी 2014 आणि 2019 मध्ये झालेल्या विधानसभा निवडणुकीत यश मिळवल्यानंतर यंदाच्या निवडणुकीत भाजपकडून कोणाला संधी मिळेल? याकडे लक्ष लागून होते परंतु भाजपने पहिल्या 99 उमेदवारांच्या नावात आमदार राजूमामा भोळे यांच्या नावावर शिक्कामोर्तब केले आहे.
भुसावळात आमदार संजय सावकारेच उमेदवार सलग तीन टर्म आमदार राहिलेले आमदार संजय सावकारे यंदा विजयाच्या चौकारासाठी रिंगणात उतरले असून त्यांनाच भाजपाकडून तिकीट देण्यात आले आहे. भाजपाचा उमेदवार जाहीर झाला असलातरी महाविकास आघाडीत मात्र अद्यापही उमेदवारीवर खल सुरू आहे.
रावेरात अमोल जावळेंना संधी
रावेर विधानसभेतून स्व. हरिभाऊ जावळे यांचे पुत्र अमोल जावळे यांना तिकीट मिळेल व पहिल्याच यादीत त्यांनाही स्थान मिळाले आहे.स्व. हरिभाऊ जावळे यांचे पक्षासाठी असलेले योगदान व अमोल जावळे यांना लोकसभेत तिकीट नाकारल्यानंतर त्यांनी दाखवलेल्या संयमाची पक्ष नेतृत्वाने दखल घेतली आहे. शांत व संयमी व्यक्तीमत्व असलेल्या जावळे यांनी नेपाळ अपघातात जखमींना हलवण्यासाठी विशेष मदतकार्य केले आहे.
♦️ खान्देशात या उमेदवारांना संधी
• भुसावळ - आमदार संजय सावकारे
• जळगाव शहर- आमदार राजू मामा भोळे
• चाळीसगाव- आमदार मंगेश चव्हाण
• जामनेर- गिरीश महाजन
• रावेर- अमोल जावळे
• नंदुरबार - विजयकुमार गावीत
• शहादा- राजेश पाडवी
• धुळे- अनुप अग्रवाल
• शिंदखेडा- जयकुमार
• शिरपूर- काशीराम पावरा