चोपड्यात 28 ऑक्टोबर पर्यंत ३ उमेदवारी अर्ज दाखल.. बाळू कोळी, हिरालाल कोळी व सुनील भील यांचा समावेश
चोपडा दि.२८(प्रतिनिधी) चोपडा विधानसभा मतदारसंघात नामांकन पत्र घेऊन जाणाऱ्यांची संख्या व नामांकन पत्र वितरणाचा आकडा मोठा आहे तरीही तीनच उमेदवारांनी अर्ज दाखल केला आहे.दोन उमेदवार अपक्ष असून एका उमेदवाराने भारत आदिवासी पार्टी तर्फे उमेदवारी दाखल केली आहे.त्यांची नावे बाळू साहेबराव कोळी(वराड,ता.चोपडा अपक्ष),हिरालाल सुरेश कोळी(हरीपुरा,ता.यावल अपक्ष),सुनील तुकाम भिल(धानोरे खुर्द,ता.जळगाव भारत आदिवासी पार्टी) असे असून उमेदवारी दाखल करण्यात तिघांनी आघाडी घेतली आहे निवडणूक निर्णय अधिकारी श्री.गजेंद्र पाटोळे यांच्याकडे त्यांनी आप आपले नामांकन दाखल केले असून यावेळी सहाय्यक निवडणूक अधिकारी भाऊसाहेब थोरात उपस्थित होते.
चोपडा विधानसभा मतदारसंघात दिनांक 28 ऑक्टोबर पर्यंत एकूण 38 उमेदवार आणि त्यांच्या प्रतिनिधींनी एकूण 87 नामनिर्देशन पत्र घेतलेले आहेत. आज 28 ऑक्टोबर रोजी आठ उमेदवारांनी 21 अर्ज घेतलेले आहेत. असे असले तरी अजून पर्यंत फक्त तीनच उमेदवारांनी आपले नामनिर्देशन पत्र भरून निवडणूक निर्णय अधिकाऱ्यांकडे दाखल केले आहेत. बाळू साहेबराव कोळी आणि हिरालाल सुरेश कोळी यांनी अपक्ष तर सुनील तुकाम भिल यांनी भारत आदिवासी पार्टी या पक्षाच्या वतीने आपले नामनिर्देशन पत्र भरले आहेत.