विचखेडा व धुपे जि.प.शाळेत मोफत वह्या वाटप

 

विचखेडा व धुपे  जि.प.शाळेत मोफत वह्या वाटप

चोपडा दि.13(प्रतिनिधी) ग्राम विकास मंत्री ना.श्री.गिरीशभाऊ महाजन व केंद्रीय क्रीडा,युवक कल्याण मंत्री ना.श्रीमती रक्षाताई खडसे यांच्या मार्गदर्शनाखाली भारतीय जनता पार्टी अनुसूचित जमाती मोर्चा तर्फे अनुसूचित जमाती विभाग जिल्हाध्यक्ष मगन बाविस्कर (सर) यांच्या माध्यमातून विचखेडा व धुपे जि.प.शाळेत गरीब गरजवंत विद्यार्थिनींना वह्या वाटप करून मोलाचा हात दिला आहे.

विचखेडा जि.प.शाळेत भाजपा तालुका उपाध्यक्ष भरत गुलाबराव पाटील व शाळा व्यवस्थापन समिती अध्यक्ष राहुल भदाणे यांच्या हस्ते वह्या वाटप करण्यात आल्या यावेळी पालक रविंद्र पाटील, उपशिक्षक तुषार पवार हे उपस्थित होते.. ..

Post a Comment

थोडे नवीन जरा जुने