झिपरु अण्णा विद्यालयाचे बॉक्सिंग स्पर्धेत यश

 झिपरु अण्णा विद्यालयाचे बॉक्सिंग स्पर्धेत यश

 

    जळगांवदि.१३(प्रतिनिधी) जिल्हास्तरीय म. न. पा. शालेय बॉक्सिंग स्पर्धा 2024-25 आज दि. 13/09/2024 रोजी जळगांव जिल्हा क्रिडा संकुल येथे आयोजित करण्यात आलेल्या होत्या. जळगांव मनपा हद्दीत असणाऱ्या शाळेतील 14/17/19 वर्षाखालील मुले व मुलींनी या स्पर्धेत वजन व वयोगटानुसार सहभाग नोंदविला. सदर स्पर्धेत झिपरु अण्णा प्राथमिक /माध्यमिक विद्यालय सुप्रीम कॉलनी जळगांव शाळेतील विद्यार्थी यांनी त्यांच्या वजन गट व वयानुसार यश मिळवले. 

त्यात 14 वर्ष खालील मुले गट 32-34 मध्ये वेदांत वाल्मीक पाटील प्रथम, 17 वर्ष खालील मुले गट -४६ मध्ये हितेश संतोष जाधव, गट-48 ते 50 मध्ये लकी छबीलाल मद्देशिया प्रथम क्रमांकाने यश संपादीत केले आहे. त्यांनी केलेल्या परिश्रम व मेहनत लक्षात घेता संस्थेचे अध्यक्ष ॲड. नेमचंद मोतीलाल येवले, सचिव श्री. मोतीलाल लक्ष्मण येवले यांनी त्यांचे गुलाब पुष्प व तोंड गोड करून कौतुक केले व पुढील स्पर्धेत यश समपदीत करावे यबाबत मार्गदर्शन व शुभेच्छा दिल्या. त्यांनी केलेल्या परिश्रम बाबत शाळेतील सर्व विदयार्थीवर्ग, शिक्षवृंद, व शिक्षकेतर कर्मचारी यांनी कौतुक केले.

Post a Comment

थोडे नवीन जरा जुने