चोपड्यात दि.३ ते १५ आक्टोबर दरम्यान वहनोत्सव व रथोत्सव ♦️श्री.व्यंकटेश बालाजी संस्थानची शेकडो वर्षांची परंपरा

 चोपड्यात ३  ते १५ आक्टोबर दरम्यान वहनोत्सव व रथोत्सव

♦️श्री.व्यंकटेश बालाजी संस्थानची शेकडो वर्षांची परंपरा

चोपडा दि.३०(प्रतिनिधी) - येथील श्री व्यंकटेश बालाजी संस्थांनाचा सुमारे चारशे पेक्षा जास्त वर्षांची विशाल परंपरा असलेला वहनोत्सव व रथोत्सव दि.३ ते १५ आक्टोबर दरम्यान शहरात साजरा होणार असल्याची माहिती संस्थानचे अध्यक्ष प्रवीण  गुजराथी व विश्वस्तांनी यांनी दिली आहे.

चोपड्याच्या या सांस्कृतिक वारसा असणाऱ्या या ब्रम्होत्सव महोत्सवाला दि.३ पासून वहनोत्सव सुरु होवून दररोज वेगवेगळ्या वहनावर आरुढ होवून श्री बालाजी महाराजांची विविध भागात वाजत गाजत मिरवणूक काढण्यात येईल.त्यानिमित्ताने या उत्सवाची मोठी उत्सुकता नागरिकांमध्ये आहे.

वहन व त्याचा मार्ग खालीलप्रमाणे 

दि.३ हत्ती ( गांधी चौक,बाजारपेठ ),दि.४ गरुड (मोठा देव्हारा, गणेश कॅालनी),दि.५ मारुती (अरुणनगर,श्रीराम नगर),दि.६ सुर्य (गुजर अळी),दि.७ नागोबा( सुंदरगढी),दि.८ सिंह ( जबरेराम मंदिर,भाटगल्ली),दि.९ मोर ( बडगुजर गल्ली),दि.१० चंद्र ( पाटील गढी,मल्हारपुरा),दि.११ वाघ ( गुजराथी गल्ली ),दि.१२ घोडा( चौधरी वाडा,बाजारपेठ),दि.१३ बत्तीस पुतळी (गांधी चौक,बाजारपेठ)

वहनोत्सव दररोज धार्मिक विधीनंतर रात्री नऊ वाजेनंतर मंदिरापासून निघेल.

१४ व १५ आक्टोबरला रथोत्सव

श्री व्यंकटेश बालाजी संस्थानचा खान्देशात प्रसिद्ध असलेला रथोत्सव दि.१४ व १५ ला होणार आहे.दि. १४ ला सकाळी१० वाजता गोलमंदिरा जवळील श्री.बालाजी मंदिरापासून श्री बालाजी महाराजांच्या रथोत्सवाला प्रारंभ होईल.आशा टॅाकीज,ग्रामदैवत श्री आनंदी भवानी मंदिर, रथ मार्गाने रथ आठवडे बाजार,पाटील दरवाजा मार्गाने छत्रपती शिवाजी महाराज चौकात मुक्कामी येईल.त्याठिकाणी रात्रभर भाविकांच्या दर्शनासाठी राहिल.तर दि.१५ रोजी रथाच्या परतीच्या प्रवासाला सकाळी १० वाजता प्रारंभ होईल.बाजारपेठ मार्गाने पुन्हा गोलमंदिराजवळ येवून यंदाच्या वहनोत्सव रथोत्सवाचा समारोप होईल.

या निमित्ताने रथोत्सव काळात शहरात दोन दिवसाची रथयात्रा देखील भरत असते.या शहराच्या श्रध्देचा भाग असलेल्या सांस्कृतिक व धार्मिक कार्यक्रमात नागरिकांनी मोठ्या संख्येने सहभागी होण्याचे आवाहन संस्थानच्या पदाधिकाऱ्यांनी केले आहे.

Post a Comment

थोडे नवीन जरा जुने