मध्य प्रदेशात इलेक्ट्रो होमिओपॅथीचा सेमिनार झाला संपन्न

 मध्य प्रदेशात इलेक्ट्रो होमिओपॅथीचा सेमिनार झाला संपन्न

♦️कार्यक्रमात चोपडा चे डॉ पालीवाल होते प्रमुख व्याख्याता

 चोपडा,दि.३० (प्रतिनिधी)जिल्हा बुरहानपूर इलेक्ट्रो होमिओपॅथी प्रॅक्टिशनर ग्रुप तर्फे बुरहानपूर येथील हॉटेल अंबिका येथे डॉ. दीपक वाबळे यांच्या समन्वयाने सेमिनारचे  आयोजन करण्यात आले होते.  या कार्यक्रमात बुऱ्हाणपूर-खंडवा लोकसभा मतदारसंघाचे लोकप्रिय खासदार दादासो. श्री ज्ञानेश्वरजी पाटील हे प्रमुख पाहुणे म्हणून उपस्थित होते त्यांचे स्वागत डॉ.धर्मेंद्र महाजन यांनी केले. तसेच महाराष्ट्राच्या जळगाव जिल्ह्यातील इलेक्ट्रो होमिओपॅथीचे प्रसिद्ध व्याख्याते, डॉ.विशाल पालीवाल यांचे स्वागत डॉ.प्रशांत पाटील यांनी केले. खासदार प्रतिनिधी श्री गजेंद्रजी पाटील यांचे स्वागत डॉ.रविकिरण पाटील यांनी केले व या कार्यक्रमाचे आयोजक कृष्णा लाईफ केअर हॉस्पिटलचे संचालक डॉ.अजय चौकसे व डॉ.सुजय चौकसे यांचे स्वागत डॉ. जितेंद्र महाजन यांनी केले.

 खासदार श्री. ज्ञानेश्वरजी पाटील यांनी आपल्या भाषणात सांगितले की, इलेक्ट्रोपॅथीच्या माध्यमातून तुम्ही प्राथमिक उपचार देऊन रुग्णाचे प्राण वाचवण्याचे काम करत आहात आणि पद्धत वेगळी असू शकते पण रुग्णाचा जीव वाचवणे हा सर्वांचा उद्देश एकच आहे. कोरोनासारख्या महामारीमध्ये विशेषतःतुमच्यासारख्या चिकित्सकांनी लोकांचे प्राण वाचवण्याचे काम केले.  कोरोनाच्या काळात आपण ग्रामीण भागात प्राथमिक आरोग्य सेवा दिली नसती तर अनेकांना याचा फटका बसला असता. तुमचे शास्त्र वेगळे असेल पण त्याद्वारे तुम्ही आरोग्य देण्याचे कामही करता. मिळालेल्या माहितीनुसार, राजस्थान सरकारनेही इलेक्ट्रो होमिओपॅथीच्या विकासासाठी सकारात्मक पावले उचलली आहेत. तुम्हाला प्रशासना तर्फे होणाऱ्या  समस्या सोडवण्यासाठीही प्रयत्न करणार असल्याची ग्वाही  दिली.  मी माननीय केंद्रीय आरोग्य मंत्री यांच्याशी चर्चा करेन की भारत सरकारकडून तुमच्यासाठी काही व्यवस्था असावी जेणेकरून ही वैद्यकीय प्रणाली सरकारी मापदंडांच्या आधारे विकसित करता येईल. आयुष्मान भारत योजनेबाबत ते म्हणाले की, गरीब व्यक्तीला त्याच्या उपचारासाठी त्रास सहन करावा लागू नये आणि त्याला उपचारासाठी त्याची मालमत्ता विकावी लागू नये. योग्य रुग्णालयात चांगले उपचार मिळायला पाहिजे त्यासाठी आपले माननीय पंतप्रधान श्री नरेंद्र मोदी यांनी आयुष्मान भारत योजना सुरू केली आहे या अंतर्गत सर्वसामान्यांसाठी 5 लाख रुपयांपर्यंत मोफत उपचाराची व्यवस्था करण्यात आली आहे आणि याचा पुरेपूर लाभ जनसामान्यांना मिळत आहे.


चोपडाचे डॉ. विशाल पालीवाल यांनी सांगितले की, इलेक्ट्रो होमिओपॅथी हे 157 वर्षांहून अधिक जुने वैद्यकीय शास्त्र आहे आणि ते भारतात 133 वर्षांपासून प्रचलित आहे.  युरोपियन मेडिकल रिफॉर्मर पॅरासेल्सस यांनी 15 व्या शतकाच्या कालखंडात स्पेजरिक किंवा प्लांट अल्केमी चे वर्णन केले होते.  या आधारावर युरोपच्या इटलीतील  डॉ. काउंट सिझर मँटी यांनी सन 1866 मध्येइलेक्ट्रो होमिओपॅथी  वैद्यकशास्त्रचा अविष्कार   केला.  इलेक्ट्रो होमिओपॅथी ही एक हॉलिस्टिक वैद्यकीय प्रणाली आहे.  यामध्ये 87 फॅमिलीतील 114 वनस्पतींच्या प्रजातीं औषधांचा स्रोत म्हणून वापरल्या जातात.  वनस्पतींपासून औषधी बनवण्याची एक अद्भुत वैज्ञानिक प्रक्रिया आहे ज्याला कोहोबेशन म्हणतात. यामध्ये डॉ. मॅटी, डॉ. क्रॉस आणि डॉ. झिंपल यांचे मुख्य योगदान आहे.  कोहोबेशन प्रक्रिया देखील या शास्त्राला इतर वैद्यकीय प्रणालींपासून वेगळे करते.

 इलेक्ट्रो होमिओपॅथीमधील 'इलेक्ट्रो' हा शब्द औषधी वनस्पतींपासून मिळवलेल्या फायटोकेमिकल्सच्या अर्कातून मिळणाऱ्या 'जैव-ऊर्जा'ला सूचित करतो. तसेच या शास्त्रानुसार ब्लड आणि लिम्फ हे मानवी शरीरातील दोन प्रकारचे महत्त्वाचे द्रव्य आहेत. शास्त्राच्या तत्त्वज्ञानानुसार यापैकी एक किंवा दोन्ही दूषित असल्यास ते शरीरात रोगाचे कारण मानले जाते.  येथे होमिओ या शब्दाचा होमिओपॅथीशी अजिबात संबंध नाही, काही चिकित्सक अज्ञानामुळे या शास्त्राला होमिओपॅथी मानतात.  होमिओ हा शब्द होमिओस्टॅसिस यापासून घेतलेला आहे.  होमिओस्टॅसिस म्हणजे इक्विलिब्रियम .या शास्त्रानुसार शरीरातील ब्लड आणि लिम्फचे इक्विलिब्रियम निरंतर राहणे. त्यामुळे शरीराच्या सेल्स आणि ऑर्गन्सचे सामान्य कार्य नियंत्रित होते. याच आधारावर मानवी शरीर आणि रोगांचे निदान करण्यासाठी, शरीराचे वर्गीकरण सेंगवाईन, लिम्फॅटिक आणि मिक्सड टेम्परेमेंट मध्ये केले आहे.  इलेक्ट्रोहोमिओपॅथी मध्ये अशा अनेक वनस्पती आहेत ज्यांची बायोलॉजिकल ऍक्टिव्हिटी खूप चांगली आहे आणि त्यांच्यामध्ये लक्षणीय प्रमाणात व्हॅलेंटाईल मॉलिक्युल आढळले आहेत.  ज्याचे विश्लेषण केले जात आहे.  इलेक्ट्रो होमिओपॅथी हे 'सिनर्जी ' चे एक उत्कृष्ट उदाहरण आहे जेथे वनस्पतींच्या हर्बो-मिनरल फ्रॅक्शन मुळे गंभीर रोग देखील बरे केले जाऊ शकतात. तसेच औषधींचा वापर करण्यासाठी वेगवेगळ्या कॉन्सन्ट्रेशनचे डायल्युशन प्रयोग केले जातात. होमिओपॅथीप्रमाणे त्यात पोटेन्सीचा वापर केला जात नाही.

खासदार प्रतिनिधी श्री गजेंद्र जी पाटील यांनी आपल्या भाषणात सांगितले की, इलेक्ट्रो होमिओपॅथी वैद्यकीय प्रणालीबद्दल जाणून घेतल्यावर मी खूप प्रभावित झालो आहे.

शेवटी डॉ.प्रवीण पाटील यांनी कार्यक्रमाची सांगता करून पाहुण्यांचे आभार मानले.

Post a Comment

थोडे नवीन जरा जुने