सामाजिक, आर्थिक व पर्यावरणीय संवेदीकरनासोबत आरोग्य जोपासणे महत्वाचे: डॉ. रवींद्र देशमुख

 सामाजिक, आर्थिक व पर्यावरणीय संवेदीकरनासोबत आरोग्य जोपासणे महत्वाचे: डॉ. रवींद्र देशमुख

चोपडा दि.२८(प्रतिनिधी)कवयित्री बहिणाबाई चौधरी उत्तर महाराष्ट्र विद्यापीठ जळगाव व बागल महाविद्यालय, दोंडाईचा यांच्या संयुक्त विद्यमाने नवी दिल्लीच्या पीएमउषा अंतर्गत एकदिवशीय संवेदिकरण कार्यशाळेचे यशस्वीपणे आयोजन करण्यात आले.कार्यशाळेचे उदघाटन दोंडाईचा नगरीचे माजी नगराध्यक्ष डॉ. रवींद्र देशमुख यांच्या हस्ते झाले. त्यावेळी धूळे येथील श्री शिवाजी विद्या प्रसारक संस्थेचे कला आणि वाणिज्य महाविद्यालयाचे प्राचार्य प्रा. डॉ. मनोहरबापू पाटील व उत्तर महाराष्ट्र विद्यापीठाचे माजी विद्यार्थी विकास अधिकारी प्रा. शशिकांत बोरसे यांच्या प्रमुख उपस्थितीसह पर्यावरण साक्षरतेबाबत विद्यार्थ्यांना मार्गदर्शन करणारे बामखेडा महाविद्यालयाचे प्राचार्य प्रा डॉ. एच. एम. पाटील, सामाजिक साक्षरतेबाबत जागरूकता निर्माण करणारे ज्येष्ठ सामाजिक कार्यकर्ते तथा माजी सरपंच श्री .सुरेश महाजन, आर्थिक साक्षरतेचे महत्व समजून सांगणारे एस पी डी एम महाविद्यालय, शिरपूर येथील डॉ. दिनेश भक्कड, संगणकीय प्रणाली ते कृत्रिम बुद्धिमतेचा वापर या संदर्भात भारतात होणाऱ्या डिजिटल क्रांतीचे विश्लेषण करून सखोल माहिती विषद करणारे चोपडा महाविद्यालयातील डॉ. लालचंद पटले, धनाजी नाना महाविद्यालय, फैजपूर येथील डॉ. सागर धनगर, विद्यापीठाशी संलग्नित विविध महाविद्यालयातील १५० विद्यार्थी तसेच बागल महाविद्यालयाचे कनिष्ठ व वरिष्ठ विभागाचे शिक्षक व शिक्षकेतर बंधू भगिनी यांनी सहभाग नोंदविला. 

महाविद्यालयाचे प्राचार्य डॉ. प्रकाश लोहार यांनी आपल्या प्रास्ताविकात कार्यशाळेची गरज व उद्दिष्टे विषद करताना म्हटले की सद्य परिस्थितीत बदलत्या सामाजिक व आर्थिक गरजा भागवताना शास्वत विकास साधायचा असल्यास डिजिटल साक्षरते सोबत पर्यावरणाचे संरक्षण व संवर्धन केले पाहिजे. प्राचार्य डॉ. मनोहर पाटील यांनी उद्घाटनपर भाषणात सर्व घटकांनी संवेदनाशीलता जपून मानवी मूल्ये वृद्धिंगत केली तरच सुदृढ समाज निर्माण होतो व त्यासाठी सजग राहून एकमेकांस सहकार्य करण्याचे आव्हान केले.  विद्यापीठस्तरीय एकदिवसीय विद्यार्थी संवेदीकरण कार्यशाळेच्या अध्यक्षीय भाषणात डॉ देशमुख यांनी तरुणांना बहुआयामी साक्षरतेसोबत चांगले आरोग्य टिकवण्याची गरज आहे. सामाजिक, आर्थिक व पर्यावरणीय संवेदीकरनासोबतच नव्या पिढीने निरोगी राहूनच उज्वल भवितव्याकडे सशक्तपणे वाटचाल करण्यावर भर दिला पाहिजे असे विषद केले.

 सदर कार्यशाळेचे सूत्रसंचालन डॉ.संभाजी नरुटे व आभार प्रदर्शन समन्वयक डॉ. आर एम आठवले यांनी केले.

Post a Comment

थोडे नवीन जरा जुने