रेखाचित्र व निसर्गचित्रणातून कलेचा प्रचार प्रसार

 रेखाचित्र व निसर्गचित्रणातून कलेचा प्रचार प्रसार


चोपडा दि.२२(प्रतिनिधी)भगिनी मंडळ चोपडा संचलित अनुदानित चित्रकला महाविद्यालय चोपडा, आयोजित शैक्षणिक अभ्यास दौरातून रेखाचित्र व निसर्गचित्रण  प्रात्यक्षिकातून चोपडा तालुक्यातील मालापूर आदिवासी गावात चित्रकलेचा प्रचार प्रसार वाढविण्याच्या संकल्पनेतून अभ्यास सहल आयोजित करण्यात आली. 

प्राचार्य सुनील बारी व प्राध्यापक विनोद पाटील यांच्या प्रात्यक्षिक रेखाचित्र व निसर्गचित्रण मार्गदर्शनातून विद्यार्थ्यांचा सर्वांगीण विकासासोबत विद्यार्थ्यांच्या मनावर संस्कार घालण्याचे ,कला जोपासण्याबरोबर जीवन समृद्ध करण्याचे काम करत असते.याच बोधाने कला साधक विद्यार्थी विद्यार्थिंनीनी निसर्गरम्य परिसरात कला अभ्यास साध्य करत आदिवासी पाड्यातील लहान मुला मुलींना खाऊ वाटप केले आणि सहलीचा मनमुराद आनंद लुटला. अभ्यास सहल यशस्वीतेसाठी भगवान बारी व प्रवीण मानकरी यांचे सहकार्य लाभले.

Post a Comment

थोडे नवीन जरा जुने