विकास विद्यालयात सहविचार सभेचे आयोजन

 विकास विद्यालयात सहविचार सभेचे आयोजन 


गणपूर (ता चोपडा )ता 21: येथील विकास माध्यमिक विद्यालयात पालक, विद्यार्थी व शिक्षक सहविचार सभेचे आयोजन नुकतेच करण्यात आले. सभेच्या अध्यक्षस्थानी ऍड. बाळकृष्ण पाटील होते. यावेळी पालकांनी विद्यार्थ्यांच्या व आपल्या पाल्यांच्या विविध समस्या, अडचणी विषद केल्या. त्यावर सांगोपांग चर्चा होऊन निर्णय घेण्यात आले. त्याच बरोबर विद्यार्थ्यांच्या बुद्ध्यांक वाढीसाठी व अधिक कार्यक्षमपणे पुढे जाण्यासाठी विविध निर्णय घेण्यात आले. 

मुख्याध्यापक पी.एस. पाटील यांनी प्रास्ताविक केले. संपर्क अधिकारी एम. बी. पाटील,पर्यवेक्षक डी पी पाटील, स्वाती पाटील ,पद्माक्षी पाटील यांनी मनोगत व्यक्त केले.ऍड. बाळकृष्ण पाटील यांनी शाळेत विविध उपक्रम राबवण्यासाठी व आपल्या पाल्यांच्या भावी जीवनासाठी पालकांनीही आपली जबाबदारी स्वीकारणे गरजेचे असून सहकार्य करणे गरजेचे असल्याचे मत मांडले. कार्यक्रमाचे सूत्रसंचालन आर टी सावकारे यांनी केले. परेश पाटील,भोजू वंजारी,ए व्ही पाटील यांनीही यावेळी विचार मांडले. यावेळी पुढील दोन वर्षासाठी शालेय समितीचेही गठन करण्यात आले. समितीच्या अध्यक्षपदी अरुण भगवान पाटील व उपाध्यक्षपदी पद्माक्षी जितेंद्र पाटील यांची निवड करण्यात आली. उपस्थितांचे आभार ए बी सूर्यवंशी यांनी मानले. सरपंच भूषण गायकवाड, ग्रामपंचायत सदस्य सुनील पाटील, शाळेचे सर्व शिक्षक व पालक उपस्थित होते.

Post a Comment

थोडे नवीन जरा जुने