ज्ञानज्योती सावित्रीबाई फुले आधार योजनेसाठी अर्ज करण्याचे आवाहन

 ज्ञानज्योती सावित्रीबाई फुले आधार योजनेसाठी अर्ज करण्याचे आवाहन

 

       


जळगाव दि. 17 ( प्रतिनिधी ) - महानगरपालिका विभागीय शहरे आणि जिल्हास्तरीय / तालुकास्तरीय  शैक्षणिक संस्थांमध्ये शिक्षण घेत असलेल्या इतर मागास प्रवर्ग / विमुक्त जाती भटक्या जमाती व विशेष मागास प्रवर्गातील उच्च शिक्षण घेणाऱ्या विदयार्थ्यांना ( भटक्या जमाती क- पंडीत दीनदयाल उपाध्याय स्वयंम योजनेचा लाभ घेणारे धनगर समाजाचे विदयार्थी वगळून ) विदयार्थ्यांना सन 2024-25 या शैक्षणिक वर्षापासून इ. 12 वी नंतरच्या मान्यताप्राप्त तंत्रशिक्षण व व्यवसायिक शिक्षण अभ्याक्रमाच्या महाविदयालयांमध्ये केंद्रीभुत प्रवेश प्रक्रियेव्दारे प्रथम, व्दीतीय, तृतीय, चतुर्थ वर्षात (प्रत्येकी 150) प्रवेश घेतलेल्या परंतु शासकीय वसतीगृहात प्रवेश न मिळालेल्या एकूण 600 विदयार्थ्यांना गुणवत्तेनुसार भोजन, निवास व इतर शैक्षणिक साहित्य उपलब्ध करुन घेण्यासाठी विदयार्थ्यांच्या आधार संलग्न बँक खात्यावर थेट जमा करणेकरीता शासनाने इतर मागास बहुजन कल्याण विभागामार्फत ज्ञानज्योती सावित्रीबाई फुले आधार योजना ( भटक्या जमाती क- पंडीत दीनदयाल उपाध्याय स्वयम योजनेचा लाभ घेणारे धनगर समाजाचे विदयार्थी वगळून) सुरु केलेली आहे.

            पात्रतेचे निकष  - विदयार्थी इमाव / विजाभज/ विमाप्र प्रवर्गाचा असावा, विदयार्थ्याने अर्जासोबत जात वैधता प्रमाणपत्र सादर करणे बंधनकारक राहील, विदयार्थ्यांच्या पालकाचे उत्पन्न 2,50, 000/- पेक्षा जास्त नसावे, शैक्षणिक संस्था जेथे आहे तेथील विदयार्थी स्थानिक रहिवासी नसावा, विदयार्थी महाराष्ट्र राज्याचा रहिवासी असावा, विदयार्थी इयत्ता 12 वी नंतरचे उच्च शिक्षण घेत असावा, जास्तीत जास्त 5 वर्ष लाभ देय राहील, इ. 12 वी नंतरचे उच्च शिक्षण घेत असावा. जास्तीत जास्त 5 वर्ष लाभ देय राहील, इ. 12 वी मध्ये किमान 60 टक्के किंवा त्यापेक्षा अधिक गुण / CGPA मिळालेले विदयार्थी योजनेस पात्र राहतील, विदयार्थ्याने निवडलेला शैक्षणिक अभ्यासक्रम हा दोन वर्षापेक्षा कमी नसावा, एकच अभ्यासक्रम पूर्ण करणेपर्यंत सदर योजना लागू राहील, एका विदयार्थ्यास जास्तीत जास्त 5 वर्ष सदर योजनेचा लाभ घेता, विदयार्थ्याने मान्यता प्राप्त शैक्षणिक संस्थांमध्येच प्रवेश घेतलेला असावा. व केद्रभुत प्रवेश प्रक्रियेव्दारे प्रवेश असणे बंधनकारक, योजनेअंतर्गत लाभ मिळण्याकरिता विदयार्थ्यांची महाविदयालयीन उपस्थिती किमान 75% असणे बंधनकारक राहील तिमाही हजेरी कार्यालयास सादर करणे बंधनकारक राहील, विदयार्थ्याची निवड गुणवत्तेनुसार करण्यात येईल तसेच विदयार्थ्यांने शासकीय वसतीगृह प्रवेशाकरिता पात्र विदयार्थ्यांनी आदिवासी विकास विभागाच्या समाजिकन्याय विभागाच्या / इतर मागास बहुजन कल्याण विभागाच्या / संबंधित शैक्षणिक संस्थेमध्ये वसतीगृहास प्रवेश अर्ज सादर केलेला असावा, तसेच मोफत प्रवेश न मिळालेला विदयार्थी पात्र असेल. योजनेचा लाभ घेण्यासाठी विदयार्थ्याचे कमाल वय ३० पेक्षा अधिक नसावे, निवड करण्यात आलेला विदयार्थी संबंधित अभ्यासक्रम पुर्ण होईपर्यत लाभास पात्र राहील मात्र प्रत्येक वर्षी उत्तीर्ण होणे अनिवार्य राहील.इ. एकाच शाखेच्या पदवीकरिता सदरचा लाभ प्राप्त होईल,  70% जागा व्यवसायिक व 30% जागा बिगर व्यवसायिक अभ्यासक्रमाकरिता राखीव रहातील,

            इतर मागास प्रवर्ग / विमुक्त जाती भटक्या जाती भटक्या जमाती व विशेष मागास प्रवर्गातील उच्च शिक्षण घेणाऱ्या विदयार्थ्यांसाठी ज्ञानज्योती सावित्रीबाई फुले आधार योजने अंतर्गत लाभासाठी विदयार्थ्यांनी आवश्यक कागदपत्रासह परिपूर्ण अर्ज भरुन सहाय्यक संचालक इतर मागास बहुजन कल्याण विभाग जळगाव डॉ. बाबासाहेब आंबेडकर सामाजिक न्याय भवन, मायादेवी मंदिरासमोर महाबळ जळगाव येथे दि. 30 सप्टेंबर, 2024 पर्यंत उच्च शिक्षणाचे व्दितीय, तृतीय, चतूर्थ वर्ष प्रवेशाकरिता विदयार्थ्यांकरिता व प्रथम वर्ष प्रवेशाकरिता दि. 15 ऑक्टोंबर, 2024 पर्यंत कार्यालयीन वेळेत सादर करावेत, असे आवाहन सहाय्यक संचालक इतर मागास बहुजन विभाग योगेश पाटील यांनी केले आहे. सदरचा अर्ज ऑफलाईन असून कार्यालयात उपलब्ध असून सविस्तर माहिती करिता विदयार्थ्यांनी कार्यालयास संपर्क साधावा, असे आवाहन सहाय्यक संचालक इतर मागास बहुजन कल्याण विभाग जळगाव यांनी कळविले आहे.

Post a Comment

थोडे नवीन जरा जुने