इतर मागास बहुजन कल्याण विभागाच्या शासकिय वसतीगृहामध्ये प्रवेशाची 30 सप्टेंबरपर्यंत

 इतर मागास बहुजन कल्याण विभागाच्या शासकिय वसतीगृहामध्ये प्रवेशाची 30 सप्टेंबरपर्यंत 



जळगाव दि. 17 ( प्रतिनिधी ) - इतर मागास बहुजन कल्याण विभागामार्फत  सन 2024-25 मध्ये सुरु होणाऱ्या मागासवर्गीय मुला मुलीसाठी जळगांव येथे शासकिय वसतीगृह सुरू करण्यात आलेले आहे,   

            2024-25  या शैक्षणिक वर्षाकरिता जिल्हास्तरावर असलेल्या शैक्षणिक संस्थामध्ये प्रवेश घेतलेल्या इमाव, विजाभज, विमाप्र, अनाथ, दिव्यांग, आ.दु.घ या प्रवर्ग निहाय आरक्षण निश्चित इयत्ता १२ वी नंतर उच्च शिक्षण घेणा-या व्यावसायिक व बिगर व्यावसायिक अभ्यासक्रमाच्या मुला-मुलीना शासकिय वसतीगृहामध्ये प्रवेश देण्यात येईल.

वसतिगृहाचे नाव व पत्ता

            इतर मागास प्रवर्ग, विमुक्त जाती, भटक्या जमाती व विशेष मागास प्रवर्गातील व्यवसायिक शिक्षण घेणाऱ्या विदयार्थ्यांकरिता मुलांचे वसतीगृह लक्ष्मी नगर गट क्र. 475 भूखंड क्र. 30 गिरणा पाण्याची टाकी जवळ जळगाव,  

            इतर मागास प्रवर्ग, विमुक्त जाती, भटक्या जमाती व विशेष मागास प्रवर्गातील व्यवसायिक शिक्षण घेणाऱ्या विदयार्थ्यांकरिता मुलींचे वसतीगृह गट क्र. 53 मौजे पिंप्राळा, शिव कॉलनी, जळगाव

 वसतीगृह प्रवेशित विद्यार्थ्यांना निवास, भोजनभत्ता, निर्वाहभत्ता, इत्यादी अनुषंगिक इतर सोयी-सुविधा शासन मार्फत विनामुल्य पुरविण्यात येतील, ज्या विद्यार्थ्यांना वसतीगृहात प्रवेश घ्यायचा असेल त्यांनी सहाय्यक संचालक, इतर मागास बहुजन कल्याण जळगाव येथुन अर्ज प्राप्त करुन आवश्यक त्या कागदपत्रांसह 30 सप्टेंबर, 2024 पर्यंत सादर करावेत अधिक माहितीसाठी सहाय्यक संचालक इतर मागास बहुजन कल्याण जळगाव कार्यालय, सामाजिक न्याय भवन, मायादेवी मंदिरासमोर महाबळ, जळगाव येथे संपर्क साधावा, असे आवाहन सहाय्यक संचालक योगेश  पाटील यांनी प्रसिध्दी पत्रकान्वये कळविले आहे.

Post a Comment

थोडे नवीन जरा जुने