विद्यार्थ्यांनी शिक्षण घेत असताना आपलं ध्येय निश्चित करायला शिकले पाहिजे:डॉ. छाया खर्चे

 विद्यार्थ्यांनी शिक्षण घेत असताना आपलं ध्येय निश्चित करायला शिकले पाहिजे:डॉ. छाया खर्चे 

मुक्ताईनगर,दि.१ (प्रतिनिधी) मुक्ताईनगर येथील गायकवाड क्लास मध्ये गुणवंत विद्यार्थ्यांचा सत्कार करण्यात आला.सदर कार्यक्रमात खडसे कॉलेज चे प्रा. डॉ छाया खर्चे मॅडम, महावीर हॉस्पिटल चे संचालक डॉ. देवाशिष सिसोदिया, मुक्ताईनगर पोलीस स्टेशन चे पोलीस वानखडे दादा,गोविंदा पवार सर,शिक्षक अविनाश पाटील सर,मोरया इलेक्ट्रिकल संचालक योगेश घुले व क्लास चे संचालक सतीश गायकवाड सर तसेच सर्व विद्यार्थी उपस्थित होते. 

विद्येची देवता सरस्वती मातेला पुष्प अर्पण व दीप प्रज्वलन करून कार्यक्रमाला सुरुवात करण्यात आली.क्लासच्या संचालकांच्या हस्ते उपस्थित प्रमुख पाहुण्यांचा सत्कार करण्यात आला. अध्ययन हे अविरत पणे सुरु ठेवावे व त्यासाठी अहोरात्र मेहनत घेण्याची तयारी विद्यार्थी दशेतच नव्हे तर आयुष्यभर सुरु असावी असे मोलाचे मार्गदर्शन मुक्ताईनगर पोलीस संदीप वानखेडे सर यांनी केले. 

विद्यार्थ्यांनी शिक्षण घेत असताना आपलं ध्येय निश्चित करायला शिकले पाहिजे आणि ते साध्य करण्यासाठी प्रयत्नही करायला पाहिजे प्रयत्न केले तर कोणतीच गोष्ट अशक्य नाही वाळूचे कण रगडीता तेलही गळे याप्रमाणे कोणतीच गोष्ट करणे कठीण नाही जीवन जगत असताना अनेक वाटा निर्माण होत असतात परंतु योग्य वाट निवडणे व योग्य व्यक्तीचे मार्गदर्शन घेऊन मार्गक्रमण करणे जीवनात अतिशय महत्त्वाचे असते असे मोलाचे मार्गदर्शन डॉ. छाया खर्चे मॅडम यांनी उपस्थित मुलां मुलींना केले 

इ. 5 वी ते 12 वी च्या मुला मुलींचा सत्कार ट्रॉफी व बुके देऊन वरील मान्यवरांच्या हस्ते करण्यात आला.उपस्थित पाहुण्यांनी गुणवंत मुला मुलींचे कौतुक करून त्यांचे उदबोधन केले.कार्यक्रमला लाभलेले प्रमुख पाहुण्यांचे आभार मानून कार्यक्रमाची सांगता करण्यात आली.

Post a Comment

थोडे नवीन जरा जुने