संजय गांधी योजनेतील ५६५ निराधारांची प्रकरणे मंजूर.. आमदार सौ लताताई सोनवणे यांच्या काळात सर्वाधिक गरजूंना लाभ

 संजय गांधी योजनेतील ५६५ निराधारांची प्रकरणे मंजूर.. आमदार सौ लताताई सोनवणे यांच्या काळात सर्वाधिक गरजूंना लाभ


चोपडा दि.९(प्रतिनिधी)चोपडा तालुक्यातील वृध्द, दिव्यांग व विधवा महिलांचे कैवारी आमदार सौ लताताई चंद्रकांत सोनवणे यांच्या अध्यक्षतेखालील बैठकीत संजय गांधी निराधार योजनेचे ५६५ प्रकरणे मंजूर करण्यात आले असून आतापर्यंतच्या प्रति बैठकीत शेकडो प्रकरणे मंजूर झाल्याने निराधारांना आधार मिळाला आहे. प्रचंड संख्येने गरजूंना मदतीचा हात मिळाल्याने माय-बाप आमदार दाम्पत्य लाभल्याचा आनंद प्रथमच असहाय्यांना होत आहे.

आज दिनाक 09/09/2024 रोजी आमदार सौ.लताताई चंद्रकात सोनवणे  यांच्या अध्यक्षतेखाली संजय गांधी निराधार योजनेची बैठक चोपडा तहासील कार्यालयात तहसिलदार भाउसाहेब थोरात  यांचे उपस्थितीत संपन्न झाली त्यात  ५६५ वृद्ध,अपंग, श्रावण बाळ,विधवा,इंदिरागाधी योजना, आदी प्रकरणे मंजुर करण्यात आले. 

गोर गरिब जनतेची सेवा हिच ईश्वर सेवा जोपासणाऱ्या  आमदार सौ. लताताई सोनवणे  व माजी आमदार प्रा. चंद्रकांत सोनवणे  हे  खंबीर नेतृत्व व विचार धारा असणारे जिल्हयातील  एकमेव दाम्पत्य असून सेवाभावी मदतीचा हात देत असल्याने तेच जनतेचे नायक असावेत अशा भावना लाभार्थ्यांनी व्यक्त केल्या आहेत.

  यावेळी गट विकास अधिकारीआर. ओ. वाघ,सं. गा. नि. यो. नायब तहसिलदार अशोक सोनवणे, सदस्य संजीव शिरसाठ, राजेंद्र पाटील, ऐ. के. गंभिर सर, सौ. मंगलाताई पाटिल, सौ. मनिषाताई पाटिल, माणिकचंद पाटिल, कुणाल पाटिल, संतोष अहिरे हे सदस्य उपस्थित होते.   बैठक यशस्वीतेसाठी कर्मचारी समाधान कोळी, अनिल पाटिल यांनी परिश्रम घेतले

Post a Comment

थोडे नवीन जरा जुने