जळगाव राष्ट्रवादी काँग्रेस अजितदादा पवार गटातर्फे राज्यपालांकडे धान खरेदीसाठी शासकीय केंद्र सुरू करण्याची मागणी..

 

जळगाव राष्ट्रवादी काँग्रेस अजितदादा पवार गटातर्फे राज्यपालांकडे धान खरेदीसाठी शासकीय केंद्र सुरू करण्याची मागणी..

जळगाव दि.११(प्रतिनिधी)महाराष्ट्र राज्याचे महामहीम राज्यपाल सी पी राधाकृष्णन  जळगाव दौऱ्यावर आले असता राष्ट्रवादी काँग्रेस पक्ष अजितदादा गट यांच्या वतीने राज्यपाल महोदयांशी शेतकऱ्यांच्या विद्यमान अडचणी संदर्भात विचार विनिमय करण्यात आला जळगाव जिल्हा मध्यवर्ती सहकारी बँकेचे चेअरमन तथा राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाचे जिल्हाध्यक्ष संजय पवार यांनी राज्यपाल महोदयांना राज्य सरकार व केंद्र सरकार शेतकऱ्यांचे धान खरेदीसाठी शासकीय केंद्र सुरू करण्याचा मंत्रिमंडळाने जरी निर्णय घेतलेला असला तरी अधिकारी वर्ग सदर निर्णय अस्तित्वात आणण्यासाठी खूप वेळ करतात थोडक्यात शेतकऱ्यांचे धान ज्यावेळी शेतकऱ्यांच्या घरात येतो त्यावेळी शासकीय केंद्र सुरू नसतात त्यामुळे खाजगी व्यापारी शेतकऱ्यांनी पिकवलेलं धान्य हे कमी भावात खरेदी करतात त्यामुळे शेतकऱ्यांचे आर्थिक नुकसान होतं आणि नंतर तोच माल खाजगी व्यापाऱ्यांनी घेतलेला धान्य पुरवठा हा शासकीय खरेदी केंद्रांवर वेगळ्या खरेदी केला जातो याकडे आपण लक्ष केंद्रित करावं शासकीय खरेदी केंद्र सुरू असले तरी महसूल विभागाकडून धान्य साठवण्यासाठी गोदाम मिळत नाही व अन्न नागरी पुरवठ्याकडून बारदान मिळत नाही त्यामुळे सुरू असलेली शासकीय खरेदी केंद्र ही बंद अवस्थेत दिसतात याबाबत तसेच केंद्र शासनाने कापूस उत्पादक शेतकऱ्यांसाठी सीसीआय मार्फत खरेदी केंद्र सुरू करण्याची प्रक्रिया सुरू केलेली आहे मात्र राज्य सरकारच्या संबंधित विभागाच्या अधिकाऱ्यांनी अद्यापही शासकीय कापूस खरेदी केंद्र सुरू करण्याबाबत आदेश केंद्राने राज्य शासनास दिलेले नाहीत असे समजते त्यामुळे आपण कापूस उत्पादक शेतकऱ्यांच्या हितासाठी लवकरात लवकर कापूस खरेदीचे शासकीय खरेदी केंद्र सुरू करण्यासंदर्भात संबंधितांना सूचना द्याव्यात ही विनंतीकरण्यात आली.

त्याचप्रमाणे राज्य सरकारने लाडकी बहीण योजना, शेतकऱ्यांसाठी साडेसात h. p. शेतीपंपासाठी विज बिल माप, तसेच मुलींचे व्यावसायिक शिक्षण मोफत करण्याचा अतिशय चांगला निर्णय घेतलेला आहे तरी देखील अजून थोडाफार राज्याच्या तिजोरीवर आर्थिक भार पडला तरी हरकत नाही म्हणून शेतकऱ्यांच्या घेतलेल्या कर्जावर दोन लाखावरील कर्ज हे शेतकऱ्याने भरावे व दोन लाख रुपये शासनाने भरावे किंवा सर्वच व्याज माफ करावं फक्त मुद्दल शेतकऱ्याने भरावा यापैकी कोणताही शेतकऱ्यांच्या हितासाठी निर्णय घेतल्यास शेतकऱ्याला व बळीराजाला दिलासा मिळेल याबाबत देखील आपण शासनास विचारविनिमय करण्यास सांगावे. तसेच बागायत शेतकऱ्यांसाठी साडेसात हॉर्स पॉवरच्या शेतीपंपाचे संपूर्ण विज बिल माफ केलेले आहे परंतु जळगाव जिल्ह्यातील रावेर यावल चोपडा मुक्ताईनगर व इतर काही भागात पाण्याची पातळी ही खोल गेली असल्याकारणाने शेतकऱ्यांनी दहा हॉर्स पावर किंवा बारा हॉर्स पावर चे शेती पंप बसवलेले आहेत कारण शेतकऱ्यांना शेतापर्यंत पाणी पोहोचवण्यासाठी या शेतीपंपाची गरज असल्याकारणाने शेतकऱ्यांनी साडेसात होस्पॉवरच्यावर शेती पंप बसवलेले आहेत परंतु शासनाने फक्त साडेसात हॉर्स पॉवरच्या शेतीपंपाचेच विज बिल माफ केलेले आहे तरी आपण शासनास दहा हॉर्स पावर ते बारा हॉर्स पॉवर चे देखील शेतीपंपाचे विज बिल माफ करणे बाबत विचार विनिमय करावा तसेच खानदेश व विदर्भ या भागातील शेतकऱ्यांना कर्ज पुरवठा करणाऱ्या विविध कार्यकारी सहकारी संस्था या अनिष्ट तफावतीमध्ये तोट्यामध्ये गेलेले आहेत त्याबाबतीत देखील सदर संस्थांना वैद्यनाथन समिती ने मागे आर्थिक मदत करण्याचा निर्णय घेतला होता त्याप्रमाणे आर्थिक अर्थसाह्य केल्यास त्या उर्जिता अवस्थेत येतील याबाबतीत देखील आपण लक्ष घालावे अशा मागण्या राष्ट्रवादीराष्ट्रवादी काँग्रेस पक्षाच्या अजित दादा पवार गटाने राज्यपाल महोदय यांच्याकडे केलेले आहेत .

यावेळी राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाचे कार्याध्यक्ष योगेश दादा देसले, राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाचे महानगराध्यक्ष अभिषेक पाटील, राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाचे रावेर लोकसभा मतदारसंघाचे जिल्हाध्यक्ष उमेश दादा नेमाडे, माजी नगरसेविका अश्विनीताई देशमुख, युवतीचे अध्यक्ष अभिलाषा रोकडे, जळगाव जिल्हा बँकेचे संचालक घनश्याम भाऊ अग्रवाल, महानगराचे कार्याध्यक्ष नदीम भाई मलिक उपस्थित होते

Post a Comment

थोडे नवीन जरा जुने