भारतीय जैन संघटना चोपडा तर्फे शालेय विद्यार्थ्यांना शैक्षणिक साहित्याचे वाटप

 भारतीय जैन संघटना चोपडा तर्फे शालेय विद्यार्थ्यांना शैक्षणिक साहित्याचे वाटप


चोपडा दि.१७(प्रतिनिधी)तालुक्यातील जिल्हा परिषद उच्च प्राथमिक शाळा वराड येथे भारतीय जैन संघटना, चोपडा यांच्यातर्फे स्व. सुकलाल रुपचंद जैन यांच्या स्मृतिप्रीत्यर्थ व स्वातंत्र दिनाचे औचित्य साधत इ. १ ली च्या विद्यार्थ्यांना स्कुल किट देण्यात आले. 

याप्रसंगी संघटनेचे तालुका अध्यक्ष श्री निर्मल जैन, सचिव श्री गौरव कोचर, कार्यकारिणी सदस्य श्री दर्शन जैन, देणगीदार  व मनीष कलेक्शन चे  संचालक श्री मनन जैन व सर्व कार्यकर्ते उपस्थित होते. सदर कार्यक्रमाचे अध्यक्षस्थान शाळा व्यवस्थापन समिती च्या अध्यक्ष सौ. अनिता कोळी यांनी भूषविले. सुत्रसंचालन श्री. देवानंद वाघ यांनी केले तर आभार श्री अमित डुडवे यांनी मानले._

Post a Comment

थोडे नवीन जरा जुने