टाकावू वस्तूं पासून बनविल्या आकर्षक राख्या..झिपरू अण्णा विद्यालयात विद्यार्थ्यांचे अनोखे रक्षाबंधन

 टाकावू वस्तूं पासून बनविल्या आकर्षक राख्या..झिपरू अण्णा विद्यालयात विद्यार्थ्यांचे अनोखे रक्षाबंधन 

जळगाव दि.१६(प्रतिनिधी)जय भवानी बहुउद्दशीय मंडळ संचलित झिपरू अण्णा बाल प्राथमिक माध्यमिक विद्यालयात सुप्रीम कॉलनी जळगाव मध्ये रक्षाबंधन निमित्ताने कार्यक्रम पार पाडण्यात आला यावेळी संस्थेचे अध्यक्ष ॲड नेमचंद येवले सर सचिव श्री मोतीलाल येवले मुख्याध्यापिका श्रीमती हेमागी येवले आ पंखदी मान्यवर उपस्थित होते मुलांनी पर्यावरण पूरक टाकाऊ वस्तूंपासून आकर्षक राख्या तयार करून परिसराचे मन मोहून घेतले

तसेच मुलांनी पर्यावरण आपल्या साठी खूप मोलाचा आसून पर्यावरणात आसणारे झाडे आताच्या पिढीला खूप मोलाचे आहेत म्हणून मुलांनी झाडाला राखी बांधून परिसरात झाडे लावा तसेच झाडे जगवा असा संदेश दिला नंतर शाळेतील चिमुकल्या मोठ्या बहिणींनी त्यांच्या लाडक्या भावाचे औक्षण करून त्यांना राख्या बांधल्या व लाडक्या भावांनी बहिणींना भेट वस्तु दिली कार्यक्रम शिक्षक व शिक्षकेत्तर कर्मचाऱ्यांच्या उपस्थितीत पार पाडण्यात आला

Post a Comment

थोडे नवीन जरा जुने