तेरापंथ युवक परिषदतर्फे मतदार कार्ड बनविण्याचे शिबिर संपन्न

 

तेरापंथ युवक परिषदतर्फे मतदार कार्ड बनविण्याचे शिबिर संपन्न

जळगाव दि.५(प्रतिनिधी):शांती दूत महान तपस्वी आचार्य श्री महाश्रमण जी यांच्या शिष्या साध्वी श्री प्रबलयशा जी ठाणे यांचे शुभ पठण ऐकल्यानंतर जळगाव येथील तेरापंथ युवक परिषदतर्फे  रविवार, 4 ऑगस्ट 2024 रोजी अनुव्रत भवन येथे समस्त तेरापंथ समाजासाठी मतदार कार्ड बनविण्याचे शिबिर आयोजित करण्यात आले होते. या शिबिराच्या माध्यमातून सभासदांचे नवीन निवडणूक ओळखपत्र बनविण्यात आले व जुन्या कार्डातील त्रुटी दूर करून एकूण 60 सभासदांनी लाभ घेतला.
प्रमुख पाहुणे श्री.योगेश नन्नवरे (महसुल विभाग जिल्हाधिकारी कार्यालय, जळगाव) तर विशेष अतिथी जे.डी.सी.सी बॅंक संचालक श्री.रोहित  निकम हे उपस्थित होते.
या शिबिराचे आयोजन   अरुण बुचाजी यांनी पार पाडली, तसेच टीयूपीचे माजी अध्यक्ष सुदर्शन  बैद, उपाध्यक्ष रितेश  छाजेड, मंत्री अजित  साखला, सहमंत्री मिलिंद गेल्डा, निशांत बोथरा यांचे विशेष सहकार्य लाभले.

Post a Comment

थोडे नवीन जरा जुने