मुलनिवासी कर्मचारी कल्याण महासंघाचे आमदार राजेश पाडवी यांना विविध मागण्यांचे निवेदन

 मुलनिवासी कर्मचारी कल्याण महासंघाचे आमदार राजेश पाडवी यांना विविध मागण्यांचे निवेदन

शहादा,दि.४(प्रतिनिधी):आज दिनांक  4/8/2024 रोजी मुलनिवासी कर्मचारी कल्याण महासंघाच्या केंद्रीय कार्यकारणी  व जिल्हा पदाधिकारी यांचेवतीने विविध मागण्यांचे निवेदन आमदार  राजेश पाडवी यांना देण्यात आले.
निवेदनात  राज्य सरकारी कर्मचारी यांना जुनी पेंशन योजना लागु करणे, नंदूरबार जिल्ह्यात निवृत्तीधारक शिक्षकांना मानधन तत्वावर भरती न करता त्याजागी पात्रता धारकांची भरती करणे, सर्व विभागातील कर्मचारी वर्गाची लवकरात लवकर पदे भरती करणे आदी मागण्या करण्यात आल्या आहेत.
सरकारी कर्मचारी यांना जुनी पेंशन योजना लागु करणे बाबत केंद्रीय कार्यकारणी सदस्य तथा   मुलनिवासी विद्यार्थी संघांचे समन्वयक हेमकांत मोरे  यांनी  निवृत्ती वेतन म्हातारपणासाठी जीवन जगण्यासाठीचा  मोठाआधार असतो हे सखोलपणे आमदारांना समजावून सांगितले. त्यावर प्रश्न मार्गी लावण्यासाठी प्रयत्नशील असल्याचे आश्वासन आ.पाडवी यांनी दिले.
  यावेळी नंदुरबार जिल्हाध्यक्ष गोकुळदास बेडसे  म्हणाले की, नंदुरबार जिल्ह्यात पेसा अंतर्गत अनुसूचित जमाती मधील जवळपास 268 निवृत्ती धारक शिक्षकांना मानधन तत्वावर नियुत्ती देण्यात येणार आहे. तसे झाल्यास खाजगीकरणाला वाव मिळणार आहे. त्यास  मूलनिवासी कर्मचारी कल्याण महासंघाचा नेहमीच विरोध करेल. असे स्पष्ट केले चर्चेत उपाध्यक्ष रमेश  बिरारी यांनीही सहभाग घेतला.
यावेळी जिल्हा सदस्य दिलीप खैरनार ,जिल्हा मिडीया प्रभारी सुभाष सावंत, जिल्हा सचिव  रामराज गायकवाड आदी उपस्थित होते.

Post a Comment

थोडे नवीन जरा जुने