सामाजिक न्याय विभागाच्या वसतीगृह प्रवेशासाठी अर्ज करण्याचे आवाहन

 सामाजिक न्याय विभागाच्या वसतीगृह प्रवेशासाठी अर्ज करण्याची मुदत ३० ऑगस्ट पर्यंत 

      



   
जळगाव दि.  ( प्रतिनिधी ) : महाराष्ट्र शासनाच्या सामाजिक न्याय व विशेष सहाय विभागाच्या शासकीय वसतीगृहामध्ये सन २०२४-२०२५ या शैक्षणिक वर्षात जळगांव जिल्हयातील एकूण १२ शासकीय वसतीगृहांमध्ये व्यवसायिक अभ्यासक्रमासाठी वसतीगृह प्रवेश प्रक्रिया ऑनलाईन https://hmas.mahait.org या पोर्टलव्दारे दिनांक ३१ जुलै २०२४ ते ३०ऑगस्ट, २०२४ पंर्यंत प्रवेश अर्ज भरता येणार आहे.

            जिल्हयातील शैक्षणिक संस्थामध्ये प्रवेश घेतलेल्या अनुसुचित जाती, अनुसुचित जमाती, विमुक्त जाती व भटक्या जमाती, इतर मागासवर्ग व विशेष मागासप्रवर्ग, दिव्यांग, अनाथ, या प्रवर्ग निहाय आरक्षण निश्चित केल्यानुसार व्यवसायीक अभ्यासक्रमासाठी प्रथम वर्षाच्या प्रवेशित विद्यार्थ्यांना समाज कल्याण विभागाच्या शासकीय वसतीगृहांमध्ये प्रवेश घेता येईल.

            सन २०२४-२५ या शैक्षणिक वर्षात व्यवसायीक अभ्यासक्रमासाठी रिक्त जागांवर प्रवेश देण्याची प्रक्रिया खालील वसतीगृहांमध्ये सुरु आहे.

जिल्हयात कार्यरत असलेल्या शासकीय वसतीगृहांचा तपशिल

१)         डॉ. बाबासाहेब आंबेडकर मागासवर्गीय मुलांचे शासकीय वसतीगृह, जळगांव

२)        मागासवर्गीय गुणवंत मुलांचे शासकीय वसतीगृह, जळगांव ३) मागासवर्गीय तथा आर्थीकदृष्टया मागासवर्गीय मुलीचे शासकीय वसतीगृह, जळगांव  ४)डॉ. बाबासाहेब आंबेडकर मागासवर्गीय मूलांचे शासकीय वसतीगृह, भुसावळ जि. जळगांव ५)मागासवर्गीय मुलीचे शासकीय वसतीगृह, भुसावळ जि. जळगांव ६)डॉ. बाबासाहेब आंबेडकर मागासवर्गीय मूलांचे शासकीय वसतीगृह, बोदवड जि. जळगांव ७) डॉ. बाबासाहेब आंबेडकर मागासवर्गीय मुलांचे शासकीय वसतीगृह, मुक्ताईनगर जि. जळगांव    ८) डॉ. बाबासाहेब आंबेडकर मागासवर्गीय मुलांचे शासकीय वसतीगृह, अमळनेर जि. जळगांव

९) मागासवर्गीय मुलीचे शासकीय वसतीगृह, अमळनेर जि. जळगांव  १०) मागासवर्गीय तथा आर्थिक दृष्टया मा.व  मुलीचे शासकीय वसतीगृह, चाळीसगांव जि. जळगांव ११)  मागासवर्गीय तथा आर्थीकदृष्टया मागासवर्गीय मुलीचे शासकीय वसतीगृह, रावेर जि. जळगांव १२) मागासवर्गीय मुलांचे शासकीय वसतीगृह, रावेर जि. जळगांव

            तसेच वसतीगृह प्रवेशित विद्यार्थ्यांना भोजन, निवास, दरमहा निर्वाहभत्ता, शैक्षणिक साहित्यासाठी रोख रक्कम, गणवेश ड्रेसकोड रक्कम, इत्यादी अनुषंगिक इतर सोयी-सुविधा शासना मार्फत विनामुल्य पुरविण्यात येतात.

            वसतीगृह प्रवेश अर्ज ऑनलाईन https://hmas.mahait.org या पोर्टलव्दारे दि. ३१ जुलै, २०२४ ते ३० ऑगस्ट, २०२४ विहीत मुदतीत करावेत. तसेच वसतीगृह प्रवेशासाठी ऑनलाईन भरलेल्या अर्ज पोर्टलवरुन डाऊनलोड करुन त्याची प्रिंट घेऊन संबंधीत वसतीगृह किंवा सहायक आयुक्त कार्यालयास सादर करणे आवश्यक आहे. अधिक माहितीसाठी संबंधित वसतीगृह तसेच संबंधित जिल्हयाचे सहायक आयुक्त समाज कल्याण कार्यालय जळगांव येथे संपर्क साधावा असे आवाहन सहायक आयुक्त समाज कल्याण योगेश पाटील, यांनी केले आहे.

Post a Comment

थोडे नवीन जरा जुने