चोपड्यात देशभक्तीचे स्वर जल्लोषात गुंजले; रोटरी क्लबची समूहगीत स्पर्धा उत्साहात

 चोपड्यात देशभक्तीचे स्वर जल्लोषात गुंजले; रोटरी क्लबची समूहगीत स्पर्धा उत्साहात






चोपडादि.१७(प्रतिनिधी) - शालेय जीवनात विद्यार्थ्यांमध्ये राष्ट्रभक्ती व एकतेची भावना रुजावी म्हणून स्वातंत्र्य दिनाचे औचित्य साधून शालेय व महाविद्यालयीन विद्यार्थ्यांसाठी समूहगीत गायन स्पर्धा आयोजित करण्यात आली होती. सदर स्पर्धेसाठी चोपडा शहरातील शाळांनी सत्यम, शिवम, सुंदरम व वंदे मातरम या गटांमध्ये सहभाग घेतला होता. या स्पर्धेला श्रोते म्हणून जवळपास ११०० विद्यार्थी व पालक उपस्थित होते. विविध शाळा महाविद्यालयांचे एकूण २८ संघ या स्पर्धेत सहभागी झाले होते. स्पर्धक विद्यार्थी संख्या ही ५६० च्या जवळपास होती. या स्पर्धेला प्रचंड प्रतिसाद लाभला.

           चोपडा येथील रोटरी क्लब, इनरव्हील क्लब, रोट्रॅक्ट क्लब, रोटा किड्स व चोपडा नगरपरिषद यांच्या संयुक्त विद्यमाने दि. १५ ऑगस्ट रोजी राष्ट्रभक्तीपर समूहगीत गायन स्पर्धा आयोजित करण्यात आली होती. या स्पर्धेसाठी प्रमुख पाहुणे म्हणून ओरिसा येथे देशसेवा बजावत असलेले केंद्रीय राखीव दलातील जवान सुनील पाटील (अकुलखेडा) हे उपस्थित होते. यावेळी मंचावर रोटरी क्लब ऑफ चोपडाचे अध्यक्ष रोटे. प्राचार्य डॉ. ईश्वर सौंदाणकर, मानद सचिव भालचंद्र पवार,सहप्रकल्प प्रमुख लीना पाटील, इनरव्हील क्लबच्या अध्यक्ष डॉ. वैशाली सौंदाणकर, सचिव पूनम गुजराथी, रोटरॅक्ट क्लबचे अध्यक्ष मयुरेश जैन, रोटा किड्सचे अध्यक्ष आरोही पाटील व सचिव रुचिता वाघ हे मंचावर उपस्थित होते. तसेच या देशभक्तीपर समूहगीत स्पर्धेसाठी परीक्षक म्हणून डॉ. मयूर अग्रवाल, संगीत शिक्षक बी. यु. जाधव व पंकज पाटील यांनी काम पाहिले. 

जल्लोषपूर्ण वातावरणात संपन्न झालेल्या या स्पर्धेचा निकाल पुढील प्रमाणे :-

सत्यम गट (१ली ते ४थी): प्रथम - महिला मंडळ व्हॉलंटरी स्कूल, द्वितीय - पंकज प्राथमिक विद्यालय, तृतीय - म. गांधी प्राथमिक विद्यालय.

शिवम गट (५वी ते ७वी): प्रथम - पंकज ग्लोबल इंग्लिश मीडियम, द्वितीय - पंकज माध्यमिक विद्यालय, तृतीय - विवेकानंद सेमी इंग्लिश मीडियम, उत्तेजनार्थ - क्रांतीज्योती सावित्रीबाई फुले म्युनिसीपल हायस्कूल. 

सुंदरम गट (८ वी ते १०वी): प्रथम - विवेकानंद इंग्लिश मीडियम स्कूल, द्वितीय - पंकज माध्यमिक विद्यालय, तृतीय - चावरा इंग्लिश मीडियम स्कूल, उत्तेजनार्थ - प्रताप विद्यामंदिर. 

वंदेमातरम गट (उच्च माध्यमिक व महाविद्यालय): प्रथम - प्रताप विद्यामंदिर उच्च माध्यमिक विद्यालय, द्वितीय - कला, विज्ञान व वाणिज्य महाविद्यालय, तृतीय - भगिनी मंडळ कला वाणिज्य महाविद्यालय, उत्तेजनार्थ - बालमोहन उच्च माध्यमिक विद्यालय यांनी यश संपादन केले.

         बक्षीस वितरण व समारोप कार्यक्रमासाठी राष्ट्रपती पदकप्राप्त चोपडा येथील उपविभागीय पोलिस अधिकारी डॉ. कुणाल सोनवणे व ज्येष्ठ समाजसेविका सौ. प्रभाबेन गुजराथी हे प्रमुख पाहुणे म्हणून उपस्थित होते. विजेत्या संघांना आकर्षक सन्मानचिन्ह व प्रशस्तीपत्र देऊन मान्यवरांच्या हस्ते गौरविण्यात आले. कार्यक्रमाचे सूत्रसंचालन लीना पाटील, अमित बाविस्कर यांनी केले तर प्रास्ताविक डॉ. सौंदाणकर यांनी व आभारप्रदर्शन बी. एस. पवार यांनी केले. कार्यक्रमच्या यशस्वीतेसाठी रोटरी डिस्ट्रिक्ट जॉईंट सेक्रेटरी नितीन अहिरराव, सदस्य आशिष गुजराथी, विलास एस. पाटील, विलास पी. पाटील, संजय बारी,प्रदीप पाटील बा,प्रवीण मिस्तरी, विलास कोष्टी,चंद्रशेखर साखरे, रुपेश पाटील, चेतन टाटिया, तेजस जैन ,विपुल छाजेड, अर्पित अग्रवाल व रोटरी सदस्य यांनी परिश्रम घेतले.

Post a Comment

थोडे नवीन जरा जुने