चोपडा महाविद्यालयातील वाणिज्य विभागात मिस्टर फेशर आणि मिस फ्रेशर यांची निवड

 चोपडा महाविद्यालयातील वाणिज्य विभागात मिस्टर फेशर आणि मिस फ्रेशर यांची निवड 

चोपडा दि.१८(प्रतिनिधी):दादासाहेब डॉक्टर सुरेश पाटील महाविद्यालय चोपडा येथे वाणिज्य विभागातर्फे स्वागत समारंभ कार्यक्रम राबविण्यात आला या कार्यक्रमात प्रथमता प्रथम वर्षाच्या विद्यार्थ्यांची प्रश्नमंजुषा स्पर्धा आयोजित करण्यात आली. या स्पर्धेतून निवड झालेल्या विद्यार्थ्यांची कार्यक्रमाप्रसंगी सर्व विद्यार्थ्यांनच्या समक्ष मुलाखत घेऊन  मिस्टर फ्रेशर म्हणून कु.मेघनाथ भालेराव व मिस फ्रेशर कु.सिद्धी भोसले यांची निवड करण्यात आली.

  कार्यक्रमात गायन स्पर्धा, सांस्कृतिक कार्यक्रम विविध खेळ यांचे आयोजन करण्यात आले विजेत्या विद्यार्थ्यांना विभागाच्या वतीने सन्मानचिन्ह देऊन विद्यार्थ्यांचा सत्कार करण्यात आला. यावेळी कार्यक्रमाचे प्रमुख अतिथी महाविद्यालयाचे प्राचार्य डॉक्टर डी.ए. सूर्यवंशी सर, उपप्राचार्य डॉक्टर के एन सोनवणे सर, समन्वयक डॉक्टर शैलेश वाघ सर,वाणिज्य विभाग प्रमुख डॉ. सी आर देवरे सर, व्यवस्थापन विभाग प्रमुख डॉ. अभिजीत साळुंखे सर, अर्थशास्त्र विभाग प्रमुख व्हि.पी. हौसे सर,दीपक करंकाळ सर,डॉ.एन. सी. पाटील सर, पी.एस.जैन. सर,श्रीमती हर्षा देवरे मॅडम,श्री.सी.पी.बाविस्कर,  घनश्याम पटेल सर,पूनम जैन मॅडम,कोमल पाटील मॅडम व सर्व वाणिज्य विभागातील विद्यार्थी उपस्थित होते.

Post a Comment

थोडे नवीन जरा जुने