चावरा इंटरनॅशनल इंग्लिश मीडियम स्कूल जवळ आढळले हिंस्त्र प्राण्याचे पंजाचे ठसे..वनविभागाच्या प्राथमिक चौकशीत निघाले "कोल्ह्या"चे ♦️ जनतेला घाबरून न जाण्याचे वन परिक्षेत्र अधिकारी बी.के.थोरात यांचे आवाहन

 चावरा इंटरनॅशनल इंग्लिश मीडियम स्कूल जवळ आढळले हिंस्त्र प्राण्याचे पंजाचे ठसे..वनविभागाच्या प्राथमिक चौकशीत  निघाले "कोल्ह्या"चे

♦️ जनतेला घाबरून न जाण्याचे वन परिक्षेत्र अधिकारी बी.के.थोरात यांचे आवाहन 


चोपडा दि.१२(प्रतिनिधी)शहरापासून अवघ्या तीन चार किलोमीटर अंतरावर बसलेल्या चावरा इंटरनॅशनल इंग्लिश मीडियम स्कूल जवळ हिंस्त्र प्राण्याचे पंजाचे ठसे आढळून आल्याने शेतकरी व ग्रामस्थांमध्ये भीतीचे वातावरण निर्माण झाले होते.त्यावर वन परिक्षेत्र अधिकारी  श्री बी. के.थोरात यांचेशी संपर्क साधून झटपट पोलखोलने छायाचित्रे पाठविली असता नागपूर विभागाचे विशेष तज्ज्ञांनी खात्री करून ते छायाचित्र कोल्ह्याचे असल्याचे स्पष्ट केले आहे . त्यामुळे लोकांनीं  आता घाबरून जाता कामा नये.तरीही शंकेची पाल चुकचुकल्यास वन विभागाशी संपर्क साधावा आपल्या मदतीला आमचे पथक लगेच हजर होईल असे आश्वासनही त्यांनी दिले.
आज दि.१२ ऑगस्ट रोजी सकाळच्या सुमारास चावरा इंटरनॅशनल इंग्लिश मीडियम स्कूलच्या गेट जवळ व शेतात वाघाच्या पंजाचे ठसे आढळून आल्याचे वृत्त पसरले  .बहुतेक ठिकाणी नखेही उमटलेले असल्याने मादी वाघीण असण्याची शक्यता अनेकांनी व्यक्त केल्याने  पालक, शेतकरी व स्कूल वाहन चालकांमध्ये घबराट उडाली.ते ठसे चोपडा अंकलेश्वर रोडवरील रस्त्यावर अनेक ठिकाणी आढळून आल्याने अकुलखेडा परिसरातील गावकऱ्यांमध्येही भीतीचे वातावरण निर्माण झाले होते. झटपट पोलखोलला वृत्त समजताच वन विभागाचे अधिकारी श्री.थोरात यांच्याशी संपर्क साधून माहिती दिली असता त्यांनी चाचणी करून योग्य ती चौकशी करून ,ते ठसे  कोल्हा चे असल्याचे निष्पन्न झाले.तरीही कोणाला काही दिसून आल्यास वा शंकास्पद आढळून आल्यास वनविभागाचशी  संपर्क साधावा आमची टीम तात्काळ दाखल होईल असे सांगत कोणी घाबरून जाऊ नये असे आवाहन  श्री.थोरात यांनी केले आहे.





Post a Comment

थोडे नवीन जरा जुने