माजी आमदार प्रा.चंदू अण्णांच्या प्रयत्नाने चोपड्याचा कायापालट : मंत्री अनिल पाटील यांचे वक्तव्य..

 

माजी आमदार प्रा.चंदू अण्णांच्या प्रयत्नाने चोपड्याचा कायापालट : मंत्री अनिल पाटील यांचे वक्तव्य.. 

♦️घनःश्याम भाई अग्रवाल मित्र परिवार व शिव कॉटनसपीन तर्फे ६५ हजार वृक्ष लागवड


चोपडा दि.२२(प्रतिनिधी)तालुक्यात प्रा.चंद्रकांत सोनवणे यांच्या मार्गदर्शनाखाली विकासाची गंगा वाहत असून निमगव्हाण पासून ते वैजापूर पर्यंत तर जळोद पासून बुधगाव मार्गे खामखेडा पुलांपर्यंत  रस्ता काम आ.लताताई सोनवणे यांच्या निधीतून मंजुर होऊन कामाची निविदाही होऊन गेली आहे एव्हढे सुपरफास्ट कामे सुरू आहेत.तसेच घनःश्याम भाई अग्रवाल मित्र परिवार निसर्गाच्या समतोल राखण्यासाठी जीवाचे रान करून वृक्ष लागवडीसाठी झोकून घेतले आहे त्याचे कार्य ही चकाकणारे असेअसल्याचे मत पुनर्वसन आपत्ती व्यवस्थापन मंत्री अनिलदादा पाटील यांनी व्यक्त केले.
ते निमगव्हाण येथे दादाजी धुनीवाले दरबार परिसरात ६५ हजार  वृक्ष लागवड कार्यक्रम प्रसंगी बोलत होते.

यावेळी माजी कार्यसम्राट आमदार प्रा.चंद्रकांत सोनवणे, जिल्हाधिकारी आयुष प्रसाद यांची खास उपस्थिती होती.याप्रसंगी .डी.सी.सी.बॅंकेचे संचालक धनश्यामभाई अग्रवाल प्रांतधिकारी महादेव खेळकर,  तहसिलदार भाऊसाहेब थोरात ,जेडीसीसी बॕक  चेअरमन संजयजी पवार ,  एम व्ही पाटीलसर , प्रविणभाई गुजराथी, विकासभाऊ पाटील ,रावसाहेब पाटील ,विजय पाटील, शिवराज पाटील ,डाॕ विक्की सनेर, मिलिदं पाटील ,कैलास बाविस्कर ,दशरथ कोळी ,गणेश पाटील , अन्नु ठाकुर, नामदेव पाटील, विनोद पाटील व निमगव्हाणचे संरपच उपसंरपच व ग्रामपंचाययत सदस्य  आदी मान्यवर उपस्थित होते. वृक्ष लागवड यशस्वीतेसाठी घनःश्याम भाई अग्रवाल मित्र परिवार व शिवकृपा काॅटनस्पीनचे कर्मचारी वृंद मेहनत घेत आहेत.

Post a Comment

थोडे नवीन जरा जुने