महाजन इंग्लिश क्लासेस "चे संचालक दिपक महाजन यांचा गुजरात राज्यात आदर्श शिक्षक पुरस्काराने गौरव

 

महाजन इंग्लिश क्लासेस "चे संचालक  दिपक महाजन यांचा गुजरात राज्यात आदर्श शिक्षक पुरस्काराने गौरव

चोपडा दि.१६(प्रतिनिधी)खान्देश साहित्य संघ सुरत (गुजरात )व मानवता बहुउद्देशीय संस्था धुळे  यांच्या संयुक्त विद्यमाने सुरत येथे आयोजित आंतरराज्य काव्य संमेलनात चोपडा  येथील "महाजन इंग्लिश क्लासेस "चे संचालक श्री दिपकजी महाजनसर यांना "आदर्श शिक्षक पुरस्कार २०२४ "ने सन्मानित करण्यात आले आहे .   

कार्यक्रमप्रसंगी खान्देशातील अहिराणी साहित्यिक सौ.रत्नाताई पाटील ,कस्तुरी मंच पुणेचे अध्यक्ष सौ.विजयाताई मानमोडे , श्री.डॉ.सदाशिवराव सुर्यवंशी, गझलकार प्रा. नरेंद्र खैरनार, दंगलकार श्री नितिन चंदनशिवे,यांच्या हस्ते मान्यवरांना पुरस्कार प्रदान करण्यात आला.
           कार्यक्रमाच्या वेळी क्ष.मा.स.सु.मं.महाराष्ट्र मध्यप्रदेश गुजरात चे  उपाध्यक्ष श्री सुरेश भिला महाजन, BSF जवान मनोहर महाजन तसेच संस्थाचालक व ख्यातनाम साहित्यिक,लेखक ,गायक व कवी आदी मान्यवर उपस्थित होते.गौरवार्थी श्री दिपक महाजन सर यांचेवर शैक्षणिक ,सामाजिक व राजकीय पदाधिकारी व समाज बांधवाकडून अभिनंदनाचा वर्षाव होत आहे.

Post a Comment

थोडे नवीन जरा जुने