धनगर समाजातील "जिज्ञासा" लेकीचा अभिमान व कौतुकास्पद कामगिरी

 धनगर समाजातील "जिज्ञासा" लेकीचा अभिमान व कौतुकास्पद कामगिरी 

चोपडा दि.२३( प्रतिनिधी)-- तालुक्यातील वर्डी येथील स्पर्धा परीक्षेतुन जळगांव जिल्ह्यात एकाच वेळी तीन सरकारी नोकरी (क्लास २) मिळवण्याची कामगीरी जिज्ञासा प्रफुल्ल नायदे बी ई सिविल इंजिनिअर हिने करून दाखविली.

स्पर्धा परीक्षेच्या माध्यमातून जिल्हा परिषद जळगाव या ठिकाणी एकाच वेळी तीन विविध पदांसाठी परीक्षेत उत्तीर्ण झाली.१ जूनियर इंजिनियर जिल्हा परीषद जळगाव, २ स्थापत्य अभियांत्रिकी सहाय्यक पदी (महिलांमध्ये प्रथम), ३डब्ल्यू.आर.डी. विभागात जूनियर इंजिनियर ,वरील तीन विविध पदांसाठी निवड समिती मार्फत पात्र झालेल्या आहेत.एकाच वेळी तीन पदांसाठी निवड झालेल्या त्या जळगाव जिल्ह्यातील एक मात्र महिला आहेत. पैकी एका पदावर त्या लवकरच शासकीय सेवेत (क्लास २) पदार्पण करणार आहेत.जिज्ञासा हि वर्डी येथील रहिवाशी व नायगाव येथील सातपुडा माध्यमिक विद्यालयाचे मुख्याध्यापक योगराज नायदे यांची सुन तर साने गुरुजी माध्यमिक विद्यालयाचे उपशिक्षक डि ए धनगर यांची कन्या आहे. तिच्या या यशाबद्दल सर्वत्र कौतुक होत

Post a Comment

थोडे नवीन जरा जुने