वडती-बोरखेडा ग्रुप ग्रा.पं.तर्फे महावृक्षारोपण कार्यक्रम संपन्न ग.स.संचालक योगेश सनेर यांनी दिली वृक्ष संवर्धनासाठी अकरा हजारांची देणगी

 वडती-बोरखेडा ग्रुप ग्रा.पं.तर्फे महावृक्षारोपण कार्यक्रम संपन्न ग.स.संचालक योगेश सनेर यांनी दिली वृक्ष संवर्धनासाठी अकरा हजारांची देणगी

चोपडा,दि.८ (प्रतिनिधी):-* येथील पं.स.चे गटविकास अधिकारी आर. ओ. वाघ यांनी संपूर्ण तालुक्यात एक लाख वृक्षारोपण व त्यांची जतन करण्याचा संकल्प केलेला असून त्या निमित्ताने वडती- बोरखेडा ग्रुप ग्रामपंचायत मार्फत २५०० वृक्षांचे रोपण करण्यात आले. सदर कार्यक्रमाच्या अध्यक्षस्थानी गटविकास अधिकारी आर.ओ.वाघ होते.

यावेळी प्रमुख अतिथी म्हणुन गटशिक्षणाधिकारी अविनाश पाटील, तालुका वैद्यकीय अधिकारी डॉ.प्रदीप लासुरकर, सहाय्यक गटविकास अधिकारी श्री. मोरे , विस्तार अधिकारी जे. पी. पाटील, ग.स.चे संचालक योगेश सनेर, केंद्रप्रमुख नरेंद्र सोनवणे, दिपक पाटील, भरत शिरसाठ, सरपंच देवानंद धनगर, उपसरपंच गजानन कोळी, ग्रा. पं. सदस्य भटू धनगर, रुमिता पावरा, मिठाराम पाटील, महेबूब तडवी यांची उपस्थिती होती. प्रारंभी दिपप्रज्वलन प्रतिमापूजन करण्यात येऊन मान्यवरांचा यथोचित सत्कार करण्यात आला. मान्यवरांनी आपल्या भाषणात वृक्षारोपणाचे महत्त्व सांगून ह्या स्तुत्य उपक्रमाबद्दल गौरवोद्गार काढले. याप्रसंगी पंचक्रोशीतील सरपंच, पोलिसपाटील, ग्रा. पं. सदस्य, व्यापारी मंडळी, ग्रामस्थं, शाळेतील विद्यार्थ्यांसह पालकमंडळी मोठ्या संख्येने उपस्थित होते. याप्रसंगी वृक्षप्रेमी व ग.स.चे संचालक योगेश सनेर यांनी मजरे हिंगोणा शाळेतील वृक्ष संवर्धनासाठी लागणाऱ्या जाळीसाठी अकरा हजार रुपयांची वैयक्तिक देणगी जाहीर केली.

  कार्यक्रम यशस्वीतेसाठी वडती- बोरखेडा ग्रुप ग्रा.पं.चे सरपंच, उपसरपंच, सर्व सदस्य, शाळेतील व केंद्रातील सर्व मुख्याध्यापक तसेच शिक्षक वृंद, आरोग्य व महिला बालविकास विभागातील अधिकारी व कर्मचारी, ग्रामसेवक दिपक भामरे, पोलीस पाटील नवल धनगर, जि. प. शाळेचे मुख्याध्यापक सुनिल धनगर, माध्य.शाळेचे मुख्याध्यापक संजय जोशी सर यांनी प्रयत्न केले. सूत्रसंचलन व आभारप्रदर्शन अतुल धनगर यांनी केले.

Post a Comment

थोडे नवीन जरा जुने