शाळेत बळी राजा कृषी विज्ञान मंडळातर्फे पारगांव जि.प.शाळेत विद्यार्थ्यांना गणवेश व साहित्य वाटप

 शाळेत बळी राजा कृषी विज्ञान मंडळातर्फे पारगांव जि.प.शाळेत विद्यार्थ्यांना गणवेश व साहित्य वाटप 

चोपडा दि.२४(प्रतिनिधी)तालुक्यातील पारगाव जिल्हा परिषद शाळेत बळी राजा कृषी विज्ञान मंडळ पारगाव  संस्थेचे चेअरमन विलास अर्जुन पाटील यांच्या मार्फत शाळेत सामाजिक उपक्रम राबविण्यात येऊन  मुलांना शालेय गणवेश व  साहित्य  वाटप करण्यात आले.
तसेच भारतीय विमा कंपनी कडून 70 रोपाचा पुरवठा करण्यात आला असून बळी राजा स्वस्थेमार्फत शाळेच्या आवारात वृक्ष लागवड करण्यात आली. याप्रसंगी चेअरमन विलास अर्जुन पाटील व भाजप तालुका अधक्ष चंद्रशेखर पाटील , साखर कारखाना माजी चेअरमन अतुल नाना ठाकरे, माजी सरपंच सुनील साहेबराव पाटील,  डॉ. चंद्रकांत बारेला, गट सचिव योगेश सनेर,  केंद्र प्रमुख राकेश पाटील, सरपंच प्रकाश इंगळे, मुख्याध्यापक राजेश पाटील ,  संस्थेचे सचिव सोपान दिनकर जगताप ,ग्राम सेवक भाईदास पाटील भारतीय विमा कंपनीचे प्रतिनिधी  ज्ञानेश्वर पाटील उपस्थित होते.

Post a Comment

थोडे नवीन जरा जुने