सामान्य नागरिकांना दिलासा न देणारा अर्थसंकल्प.. राकॉ.शरद पवार पक्षातर्फे केंद्र शासनाचा निषेध

 सामान्य नागरिकांना दिलासा न देणारा अर्थसंकल्प.. राकॉ.शरद पवार पक्षातर्फे  केंद्र शासनाचा निषेध

शिंदखेडा दि.२४(प्रतिनिधी):केंद्रीय अर्थसंकल्पात महाराष्ट्रातील शेतकऱ्यांच्या वाट्याला घोषणांचा पाऊस करून महाराष्ट्रातील जनतेची फसवणूक केली. त्यामुळे केंद्राचा हा अर्थसंकल्प सामान्य नागरिकांना कुठलाही दिलासा न देता महाराष्ट्रातील दलित, आदिवासी, मध्यमवर्ग यांच्यासाठी क्रांतिकारी योजना नाहीच.शेतकऱ्यांसाठी दीडपट हमीभाव व उत्पन्न दुप्पट करण्याची आश्वासने ही निवडणुकीतील फसवीगिरी ठरली आहे. त्यामुळे आज दि. २४ जुलै रोजी शिंदखेडा येथील तहसील कार्यालयात राष्ट्रवादी काँग्रेस पक्ष शरदचंद्र पवार पक्षाच्या वतीने केंद्र सरकार विरोधात आंदोलन करून तहसीलदारांना निवेदन देण्यात आले.

यावेळी प्रदेश सरचिटणीस संदीप दादा बेडसे, माजी जिल्हा परिषद उपाध्यक्ष कामराज भाऊसाहेब निकम, जिल्हाध्यक्ष जितेंद्र मराठे, जिल्हा परिषद सदस्य(जिल्हा कार्याध्यक्ष) ललित वारुडे, तालुकाध्यक्ष कैलास ठाकरे, शिंदखेडा शहराध्यक्ष प्रवीण पाटील, पंचायत समिती सदस्य अरुण पाटील, प्रकाश पाटील, दुर्लभ सोनवणे, उल्हास दादा देशमुख सतीश पाटील, दयाराम कुवर महेंद्र निकम, देविदास मोरे, देवानंद बोरसे सुरेश अहिराव सतीश पाटील, दुर्गेश पाटील,निलेश देसले, संजय वाल्हे , प्रविण पाटील,श्याम पाटील नरेश शिरसाठ, सागर पवार आदी उपस्थित होते.

Post a Comment

थोडे नवीन जरा जुने