उद्योगपती मुकेश अंबानींकडून आमदार सोनवणे दाम्पत्याला स्नेह पूर्ण निमंत्रण

उद्योगपती मुकेश अंबानींकडून आमदार सोनवणे दाम्पत्याला स्नेह पूर्ण निमंत्रण 

जळगाव, दि. 8 (प्रतिनिधी): यशस्वी उद्योजक तथा कल्पकतेने परिपूर्ण मुकेश अंबानी व सौ.नीता अंबानी यांचे चिरंजीव अनंत अंबानी यांचा विवाह राधिका मर्चंट या त्यांच्या बालपणाच्या मैत्रिणीबरोबर जन्मोजन्माचे बंधन विवाह स्वरुपात संपन्न होत आहे. यांचे लग्न व लग्नापूर्वीचे कार्यक्रम हे संपूर्ण जगात विशेषत: कॉर्पोरेट जगतात तसेच सर्व समाजामध्ये एक चर्चेचा तसेच अनुकरणीय विषय झालेला आहे. विशेषत: जामनगर मधील लग्नापूर्वीचा सोहळा ज्यामध्ये पर्यावरण, प्राण्यांच्या संदर्भात अनंत अंबानींचे प्रेरणादायी कार्य प्रथमत: जगासमोर आले. सौ.नीता अंबानीचे सादगीपूर्ण आदरातिथ्य, गावजेवण याचे सर्वत्र कौतुक झाले. अशा या लग्नासाठी चोपड्याचे माजी आमदार प्रा.चंद्रकांत बळीराम सोनवणे तसेच आमदार सौ.लताताई चंद्रकांत सोनवणे यांना प्रत्यक्षात आज पत्रिका प्राप्त झाली. मुंबई येथील ‘जिओ वर्ल्ड कन्वेंशन सेंटर’ मध्ये संपन्न होऊ घातलेल्या या ‘मंगल उत्सव’ समारंभास तमाम आपल्या मतदार बंधु-भगिनींच्यावतीने शुभेच्छा व शुभाशिर्वाद देण्यासाठी सोनवणे दाम्पत्य उपस्थित राहणार आहे. हे निमंत्रण म्हणजे चोपडा वासियांसाठी गौरवाची बाब असल्याचे आ. सौ. लताताई सोनवणे व प्रा.चंद्रकांत सोनवणे यांनी म्हटले आहे.

जळगाव, दि. 8 (प्रतिनिधी):यशस्वी उद्योजक तथा कल्पकतेने परिपूर्ण मुकेश अंबानी व सौ.नीता अंबानी यांचे चिरंजीव अनंत अंबानी यांचा विवाह राधिका मर्चंट या त्यांच्या बालपणाच्या मैत्रिणीबरोबर जन्मोजन्माचे बंधन विवाह स्वरुपात संपन्न होत आहे. यांचे लग्न व लग्नापूर्वीचे कार्यक्रम हे संपूर्ण जगात विशेषत: कॉर्पोरेट जगतात तसेच सर्व समाजामध्ये एक चर्चेचा तसेच अनुकरणीय विषय झालेला आहे. विशेषत: जामनगर मधील लग्नापूर्वीचा सोहळा ज्यामध्ये पर्यावरण, प्राण्यांच्या संदर्भात अनंत अंबानींचे प्रेरणादायी कार्य प्रथमत: जगासमोर आले. सौ.नीता अंबानीचे सादगीपूर्ण आदरातिथ्य, गावजेवण याचे सर्वत्र कौतुक झाले. अशा या लग्नासाठी चोपड्याचे माजी आमदार प्रा.चंद्रकांत बळीराम सोनवणे तसेच आमदार सौ.लताताई चंद्रकांत सोनवणे यांना प्रत्यक्षात आज पत्रिका प्राप्त झाली. मुंबई येथील ‘जिओ वर्ल्ड कन्वेंशन सेंटर’ मध्ये संपन्न होऊ घातलेल्या या ‘मंगल उत्सव’ समारंभास तमाम आपल्या मतदार बंधु-भगिनींच्यावतीने शुभेच्छा व शुभाशिर्वाद देण्यासाठी सोनवणे दाम्पत्य उपस्थित राहणार आहे. हे निमंत्रण म्हणजे चोपडा वासियांसाठी गौरवाची बाब असल्याचे आ. सौ. लताताई सोनवणे व प्रा.चंद्रकांत सोनवणे यांनी म्हटले आहे.

Post a Comment

थोडे नवीन जरा जुने