अग्नी शस्त्र गावठी कट्टासह एकास अटक ..चोपडा ग्रामीण पोलीसांची कारवाई

 

अग्नी शस्त्र गावठी कट्टासह एकास अटक ..चोपडा ग्रामीण पोलीसांची कारवाई


चोपडा,दि.१४(प्रतिनिधी) तालुक्यातील लासूर ते सत्रासेन रस्त्यावर नाटेश्वर मंदिराच्या पुढे लासुर गावचे हद्दीत विनापरवाना गैरकायदेशीर  गावठी पिस्तूल  कब्जात बाळगणाऱ्या एकास ग्रामीण पोलिसांनी शिताफीने पकडून जेलची हवा दाखविली आहे. यात अग्नीशस्र कट्टा (पिस्टल ) सह पंचेचाळीस हजारांचा मुद्देमाल जप्त करण्यात आला आहे.

संशयित आरोपी आकाश गोरखनाथ सोनवणे (वय २३ रा रिधुर ता.जि. जळगांव )हा आपल्या ताब्यातील काळ्या रंगाची हिरो कंपनीच्या मोटारसायकलने (नंबरGJ ०५ LT ६१०५) विनापरवाना  अग्नीशस्र  कट्टा (पिस्टल हे) घेऊन लासुर गावाजवळून जातांना मिळून आला.चोपडा ग्रामीण पोलिसांनी गुप्त माहितीच्या सदरील आरोपीस अटक करून  २०,०००/- रुपये किंमतीची मोटारसायकल व गावठी पिस्तूल असा ४५,०००/-रुपये किंमतीचा मुद्देमाल जप्त करण्यात आला आहे. ग्रामीण पोलीस ठाण्यात पोको  रावसाहेब एकनाथ पाटील  यांनी दिलेल्या फिर्यादीवरून सी.सी.टी.एन.एस.गु.र.न.१२०/२०२४ शस्त्र अधिनियम कलम ३/२५,७/२५ प्रमाणे गुन्हा  दाखल करण्यात आला आहे . पुढील तपास पोनि मधुकर धोंडीबा साळवे  यांचे मार्गदर्शनाखाली सपोनि शेषराव नितनवरे  हे करीत आहेत

Post a Comment

थोडे नवीन जरा जुने