रोटरी क्लबची वर्षाची सुरुवात वृक्षारोपण आणि डॉक्टर्स, सी.ए.च्या सन्मानाने... विविध उपक्रमांचा संकल्प

 रोटरी क्लबची वर्षाची सुरुवात वृक्षारोपण आणि डॉक्टर्स, सी.ए.च्या सन्मानाने... विविध उपक्रमांचा संकल्प

चोपडा दि.३(प्रतिनिधी)- रोटरी क्लब ऑफ चोपडाच्या नवीन वर्षाची सुरुवात ही पर्यावरण संरक्षणासाठी वृक्षरोपण व वृक्षसंगोपन प्रकल्प हाती घेऊन करण्यात आली. शहरातील हरेश्र्वर कॉलनीतील रोटरी भवन परिसरात क्लब सदस्यांच्या हस्ते कृषी दिनानिमित्त वृक्षांची लागवड करण्यात आली. या प्रसंगी झालेल्या नियमित क्लब मीटिंगमध्ये डॉक्टर्स डे व चार्टर्ड अकाउंटंट डे निमित्त क्लब सदस्य डॉक्टर्स व चार्टर्ड अकांऊटंट यांचा सन्मान करण्यात आला.

        रोटरी वर्षाची सुरुवात ही दरवर्षी १ जुलै रोजी होत असते. क्लबच्या नूतन पदाधिकाऱ्यांनी पदभार स्वीकारल्यानंतर पहिल्याच दिवशी घेण्यात आलेल्या या प्रकल्पांना रोटरी सदस्यांची मोठ्या संख्येने उपस्थिती होती. रोटरी क्लब चोपडा चे नूतन अध्यक्ष रोटे. प्रा. डॉ. ईश्वर सौंदाणकर यांच्या अध्यक्षतेखाली झालेल्या या सभेत सचिव रोटे. भालचंद्र पवार व प्रकल्प प्रमुख संतोष अग्रवाल, सहप्रकल्प प्रमुख निखिल सोनवणे, आदित्य अग्रवाल हे मंचावर उपस्थित होते. क्लब अध्यक्ष डॉ. ईश्वर सौंदाणकर यांनी वर्षभरात विविध शैक्षणिक, सामाजिक, आरोग्य व पर्यावरण विषयक उपक्रम-प्रकल्प हाती घेऊन रोटरी ग्रामीण भागात पोहोचवण्याचा संकल्प व्यक्त केला. या सभेचे सूत्रसंचालन संजय बारी यांनी तर आभार प्रदर्शन भालचंद्र पवार यांनी केले.

       याप्रसंगी तालुका व परिसरात वैद्यकीय सेवा देणारे रोटरी सदस्य डॉ. पराग पाटील, डॉ. दुर्गेश जयस्वाल, डॉ. नीता जयस्वाल, डॉ. सचिन कोल्हे, डॉ. वैभव पाटील, डॉ. भूषण सोनवणे, डॉ. ललित चौधरी, डॉ. मुकेश पाटील यांचा तसेच सीए तेजस जैन, सीए पवन गुजराथी, सीए अर्पित अग्रवाल यांचा ते देत असलेल्या सेवेप्रती कृतज्ञता म्हणून सन्मान करण्यात आला. तसेच रोटरी क्लबमध्ये प्रवेश केलेले नवीन सदस्य अमित बाविस्कर, डॉ. मुकेश पाटील, विश्वास दलाल, भूषण महाजन यांचे स्वागत तसेच डॉ नीता जयस्वाल यांचा वाढदिवस साजरा करण्यात आला.

         यावेळी क्लब सदस्य पूनम गुजराथी, लीना पाटील, एम डब्ल्यू पाटील, विलास एस पाटील, नितीन अहिरराव, अनिल अग्रवाल, संजय शर्मा, संजीव गुजराथी, पंकज बोरोले, विलास पी पाटील, रुपेश पाटील, चेतन टाटिया, मनोहर पाटील (बा), दीप अग्रवाल, विलास कोष्टी, चंद्रशेखर साखरे, शिरीष पालीवाल,आर. बी. वाघजाळे,विपुल छाजेड हे उपस्थित होते.

Post a Comment

थोडे नवीन जरा जुने