जात वैधता प्रमाणपत्राबाबतचे जाहीर आवाहन...

 जात वैधता प्रमाणपत्राबाबतचे जाहीर आवाहन...

 

  जळगाव, दि. 10 (प्रतिनिधी)  -  जळगांव जिल्हा अंतर्गत व्यवसायिक अभ्यासक्रमास प्रवेश घेऊ इच्छीणारे तसेच सीईटी सेल अंतर्गत नोंदणी होऊन प्रवेश घेणा-या अनु.जाती, विजाभज, इमाव व विमाप्र प्रवर्गातील मागासवर्गीय विदयार्थ्यांना जाहीर आवाहन करण्यात येते की, ज्या मागासगर्वीय विदयाथ्यांनी  दि. 30 जून, 2024  पर्यंत जिल्हा जात प्रमाणपत्र पडताळणी समिती डॉ. बाबासाहेब आंबेडकर सामाजिक न्याय भवन मायादेवी मंदीर समोर महाबळ जळगांव येथे जात वैधता प्रमाणपत्र प्राप्त करुन घेणेस्तव अर्ज सादर केले होते. अशा मागासवर्गीय विदयार्थ्यांचे 1 एप्रिल, 2024 ते 30 जून, 2024 या कालावधीत 4662 अर्ज निकाली काढण्यात आले आहेत. उर्वरीत अर्ज त्रुटी पुर्ततेसाठी प्रलंबित आहेत. अशा अर्जाना ऑनलाईन त्रुटी तसेच पत्राव्दारे कळविण्यात आली आहे. तसेच ज्यांना शैक्षणीक, निवडणुक, सेवा प्रयोजनार्थ त्रुटी कळविलेली असेल अशांनी तात्काळ या कार्यालयाशी संपर्क साधावा असे समितीस्तरावरुन कळविण्याल आले आहे. असे आवाहन उपायुक्त तथा सदस्य जिल्हा जात प्रमाणपत्र पडताळणी समिती व्ही. एम. वाकुलकर यांनी कळविले आहे.


Post a Comment

थोडे नवीन जरा जुने