श्रीमती शरदचंद्रिका सुरेश पाटील कॉलेज ऑफ फार्मसीच्या अंतिम वर्षाच्या विद्यार्थ्यांची NIPER JEE 2024 परीक्षेत उल्लेखनीय कामगिरी

 श्रीमती शरदचंद्रिका सुरेश पाटील कॉलेज ऑफ फार्मसीच्या अंतिम वर्षाच्या विद्यार्थ्यांची NIPER JEE 2024 परीक्षेत उल्लेखनीय कामगिरी

चोपडा, २८ जून (प्रतिनिधी–  श्रीमती शरदचंद्रिका सुरेश पाटील कॉलेज ऑफ फार्मसीच्या अंतिम वर्षातील नऊ विद्यार्थ्यांनी NIPER JEE 2024 परीक्षा यशस्वीरित्या उत्तीर्ण केली आहे.या विद्यार्थ्यांमध्ये अक्षय लिंडायत, परेश पाटील, प्रेरणा चौधरी, सुजीत निनायदे, दर्शन चव्हाण, अरविंद चौधरी, चेतना चव्हाण, उमेश जैन, सचिन बाविस्कर यांचा समावेश आहे. या यशाचे श्रेय GPAT सेल सदस्य प्राध्यापक श्रेया जैन आणि डॉ. तन्वीर शेख यांना जाते. त्यांच्या मार्गदर्शनाने आणि प्रोत्साहनाने विद्यार्थ्यांनी हे यश संपादन केले आहे.

महाविद्यालयाचे प्राचार्य डॉ. गौतम वडनेरे म्हणाले, “हे अपूर्व यश विद्यार्थ्यांच्या मेहनतीचे आणि आमच्या प्राध्यापकांच्या प्रामाणिक प्रयत्नांचे प्रतिक आहे. आम्हाला त्यांच्या यशाचा अभिमान आहे आणि त्यांच्या भविष्यातील वाटचालीसाठी शुभेच्छा देतो.”

NIPER JEE ही फार्मास्युटिकल सायन्सेसमधील राष्ट्रीय स्तरावरील उच्च शिक्षणासाठी एक प्रतिष्ठित आणि स्पर्धात्मक परीक्षा आहे. या परीक्षेत उत्तीर्ण झाल्यामुळे विद्यार्थ्यांना उच्च शिक्षण आणि फार्मास्युटिकल क्षेत्रातील संधी मिळवण्याचे दरवाजे खुले होतात.

आमच्या संस्थेचे अध्यक्ष भैयासाहेब अँड. संदीप सुरेश पाटील तसेच संस्थेच्या उपाध्यक्षा सौ. आशाताई पाटिल, सचिव, मा. ताईसाहेब डॉक्टर स्मिता संदीप पाटील, महाविद्यालयाचे प्राचार्य डॉ. गौतम वडनेरे, प्रबंधक श्री प्रफुल्ल मोरे, सर्व  शिक्षक व  विभागप्रुख, शिक्षकेतर कर्मचारी व संपादकीय टिम या सर्वांनी विद्यार्थ्यांच्या यशाचे कौतुक व अभिनंदन केले.

Post a Comment

थोडे नवीन जरा जुने