चोपडा फार्मसी महाविद्यालयात नॅक मूल्यकांनासाठी जय्यत तयारी..

 चोपडा फार्मसी महाविद्यालयात नॅक मूल्यकांनासाठी जय्यत तयारी..

चोपडा दि.२८(प्रतिनिधी)येतील महात्मा गांधी शिक्षण मंडळ संचालित श्रीमती शरदचंद्रिका सुरेश पाटील औषधनिर्माणशास्त्र महाविद्यालयास दि ५ जुलै २०२४ व ६ जुलै २०२४ रोजी नॅक मूल्यकांनासाठी त्रिसदस्यीय समिती भेट देणार असून त्या दृष्टीने महाविद्यालयात जय्यत तयारी केली आहे. 

महाविद्यालयास या अगोदर २०१६ , २०१९ , २०२२ एनबीए मूल्यकांन मिळाले आहे. महाविद्यालयातील विद्यार्थी, अलूमनी, MoU संलग्न कंपनी व पालक यांच्याशी संवाद साधणार आहेत. महाविद्यालय हे सदैव विद्यार्थी केंद्रबिंदू मानून विद्यार्थी हितासाठी तत्पर असते या निकषांचा अभ्यास करून महाविद्यालयास तीन वेळा एनबीए मानांकन मिळाले आहे.  त्याच प्रमाणे नॅक साठी सुध्दा अतिउच्च श्रेणी प्राप्त होईल असा विश्वास प्रा डॉ गौतम वडनेरे व नॅक समन्वयक प्रा डॉ मो रागीब मो उस्मान यांनी व्यक्त केला आहे. सर्व नियोजनासाठी संस्थेचे अध्यक्ष ऍड भैय्यासाहेब संदीप पाटील व सचिव  डॉ सौ स्मिताताई पाटील यांच्या मार्गदर्शनाखाली होत आहे. सर्व शिक्षक व शिक्षकेतर बंधू भगिनी जय्यत तयारी साठी परिश्रम घेत आहेत.

Post a Comment

थोडे नवीन जरा जुने