प्लास्टिक , थर्माकोल व कचरा मुक्त दिंडी निघाली पंढरपूरकडे ..हरित ,निर्मळ, स्वच्छ आणि स्वस्थ अभियानाचा शुभारंभ

 प्लास्टिक , थर्माकोल व कचरा मुक्त  दिंडी निघाली पंढरपूरकडे ..हरित ,निर्मळ, स्वच्छ आणि स्वस्थ अभियानाचा शुभारंभ 

अमळनेर, दि.२२(प्रतिनिधी):कवयित्री बहिणाबाई चौधरी उत्तर महाराष्ट्र विद्यापीठ जळगावच्या राष्ट्रीय सेवा योजना कक्षाच्या वतीने सुरू करण्यात दिंडी आज संत सखाराम महाराज संस्थान अमळनेर /प्रति पंढरपूरची दिंडी आज पंढरपूर कडे प्रस्थान झाली, त्यासाठी प्रताप महाविद्यालय अमळनेर व धनदाई कला व विज्ञान महाविद्यालय अमळनेर यांच्या संयुक्त विद्यमाने राष्ट्रीय सेवा योजना अंतर्गत प्लास्टिक थर्माकोल *कचरामुक्त* दिंडी हरित वारी- निर्मळ वारी स्वच्छ वारी -स्वस्थ वारी अभियान राबविण्यात येत आहे. 

श्री संत सद्गुरु सखाराम महाराज संस्थान अमळनेर येथून श्री क्षेत्र अंमळनेर ते श्री क्षेत्र पंढरपूर आषाढी वारी दिनांक २३ जून रोजी सुरुवात झाली याप्रसंगी सामाजिक उत्तरदायित्व म्हणून राष्ट्रीय सेवा योजनेच्या स्वयंसेवकांनी मोठ्या प्रमाणात सहभाग नोंदवला व परिसरातील कचरा,  प्लास्टिक जमा करून प्लास्टिक मुक्त वारीचा संदेश दिला. वारीत सहभागी झालेल्या सर्व विद्यार्थ्यांनी एक अभूतपूर्व आनंद मिळतो व समाजाची सेवा करण्याची प्रेरणा मिळते व साधुसंतांचे दर्शन झाले असे मत व्यक्त केले. याप्रसंगी सर्वांना सद्गुरु श्री संत सखाराम महाराज यांनी आशीर्वाद देवून कौतुक केले. दिंडी सुरू होण्याआधी संत सखाराम महाराज यांचे दर्शनाच्या ठिकाणी  स्वयंसेवक यांनी शिस्तीने वारकऱ्यांना महाराजांचा दर्शन घेण्यास मदत केली तसेच  यावेळी स्वयंसेवकांनी फुगडी खेळून  दिंडीचा आनंद घेतला, दिंडीची सुरुवात तुळशी बागेपासून  सुरू झाली सुरुवातीला स्वयंसेवक पुढे स्वयंसेवक पुढे आणि मागे वारकरी अशा पद्धतीने वारीची सुरुवात झाली,येणाऱ्या प्रत्येक वारकऱ्याचे स्वागत स्वयंसेवक करत होते, वारकऱ्यां सोबत स्वयंसेवक एक वेगळा आनंद घेत होते, वारकऱ्यांकडून शिस्तीचे धडे घेत होते, याप्रसंगी बहिणाबाई चौधरी उत्तर महाराष्ट्र विद्यापीठ जळगाव चे कुलसचिव डॉ. विनोद पाटील , राष्ट्रीय सेवा योजना संचालक प्रा डॉ. सचिन नांद्रे, अधिसभा सदस्य डॉ. संदीप नेरकर, प्रताप महाविद्यालयाचे प्राचार्य डॉ. ए बी जैन, रासेयो जिल्हा समन्वयक प्रा डॉ. दिनेश पाटील, विभागीय समन्वयक प्रा. डॉ. दिलीप गिऱ्हे, प्रा. डॉ. मनीष करंजे, राष्ट्रीय सेवा योजना कार्यक्रम अधिकारी प्रा डॉ . हेमंत पवार, प्रा. डॉ. लीलाधर पाटील प्रा. रोशनी पाटील उपस्थित होते.

Post a Comment

थोडे नवीन जरा जुने