शिक्षणशास्त्र महाविद्यालय चोपडा आयोजित माँक इंटरव्यू उत्साहात संपन्न

 शिक्षणशास्त्र महाविद्यालय चोपडा आयोजित माँक इंटरव्यू उत्साहात संपन्न


चोपडा दि.25(प्रतिनिधी)दिनांक  25 जून रोजी शिक्षणशास्त्र महाविद्यालय चोपडा येथे विद्यार्थ्यांसाठी mock interview  चे आयोजन करण्यात आले . दोन वर्ष बीएड महाविद्यालयातील प्रशिक्षण कालावधी पूर्ण झाल्यानंतर विद्यार्थ्यांना विविध ठिकाणी मुलाखतीसाठी तयार असावे लागते . या मुलाखतीची पूर्वतयारी म्हणून महाविद्यालयात विद्यार्थ्यांना  मुलाखतीचा विद्यार्थ्यांना सराव व्हावा या दृष्टिकोनातून या मुलाखतीचे आयोजन करण्यात आले. विद्यार्थ्यांचा आत्मविश्वास वाढवा, विद्यार्थ्यांनी जनरल नॉलेज वाढवावे ,आपल्या स्पेशल विषयाच्या आशय ज्ञानावर अधिकाधिक भर द्यावा . या दृष्टिकोनातून या मुलाखतीत विद्यार्थ्यांना विविध प्रश्नांना सामोरे जावे लागले . आज जरी विद्यार्थी प्रत्यक्षदृष्ट्या मुलाखतीसाठी तयार नव्हते तरीदेखील प्रत्यक्षात त्यांना ज्यावेळी मुलाखतीला सामोरे जावे लागेल त्यावेळी  आवश्यक  असणारी  सर्व तयारी या मुलाखतीच्या माध्यमातून करून घेण्यात आली. विद्यार्थ्यांच्या होणाऱ्या चुका त्यांच्या लक्षात आणून देण्यात आल्या. यासाठी विषय तज्ञ सदस्यांची कमिटी  आयोजित करण्यात आली . विविध विषयांसाठी मुलाखत घेण्यासाठी विषय तज्ञांची नेमणूक करण्यात आलेली होती. इंग्रजी विषयासाठी रजिश बालन, गणित सायन्स या विषयासाठी डी .एस.पाटील व एम.पी.पाटील,हिंदी विषयासाठी डॉ.रजनी सोनवणे व किरण पाटील ,भूगोल विषयासाठी डॉ. सविता जाधव मराठी  व जनरल नॉलेज या विषयासाठी  आय.क्यू ए.सी.कमिटीचे सदस्य गोविंद गुजराथी  यांच्या संपूर्ण कमिटीने मुलाखतीचे कामकाज सुरळीतपणे केले. विद्यार्थ्यांचा आत्मविश्वास वाढवा विद्यार्थ्यांनी आपले ज्ञान अपडेट करावे, त्याचबरोबर मुलाखतीसाठी येताना आवश्यक असणाऱ्या सर्व गोष्टीची महिती  मुलाखती नंतर विद्यार्थ्यांना देण्यात आली. सदर मुलाखत प्रताप विद्या मंदिराच्या इंग्रजी माध्यमाच्या शाळेमध्ये घेण्यात आल्या.



Post a Comment

थोडे नवीन जरा जुने