चोपडयात रोटरी क्लबने २० विद्यार्थ्यांना सायकल वाटपातून दिला मदतीचा हात'


 'चोपडयात रोटरी क्लबने २० विद्यार्थ्यांना सायकल वाटपातून दिला मदतीचा हात'

चोपडा दि.२९(प्रतिनीधी) -'रोटरी क्लब ऑफ चोपडा यांच्यावतीने चोपडा शहरासह तालुक्यातील विवीध शाळांमधील गरजू व होतकरू तथा पायी प्रवास करून शाळेत जाणाऱ्या विद्यार्थ्यांना त्यांची पायपीट कमी होवून प्रवास सुखाचा व्हावा या उद्देशाने 'उडान' प्रकल्प अंतर्गत २० सायकलींचे वाटप करण्यात आले.

या कार्यक्रमाच्या माध्यमातून 'चला शाळेत जाऊया, आनंदाने शिकुया' हा संदेश देण्यात आला.रोटरी 3030 क्लबच्या डिस्ट्रिक्ट गव्हर्नर रोटेरीयन आशा वेणूगोपाल यांच्या संकल्पनेतून जिल्ह्याभरात 2000 सायकलींचे मोफत वाटप करण्यात आले,या पार्श्वभूमीवर रोटरी क्लब ऑफ चोपडा तर्फे शहरातील नगर वाचन मंदिराच्या अमरचंद सभागृहात हा कार्यक्रम संपन्न झाला.चोपडा पंचायत समितीचे गटशिक्षणाधिकारी श्री.अविनाश पाटील यांच्याहस्ते विद्यार्थ्यांना सायकलचे वाटप करण्यात आले.

यावेळी व्यासपीठावर रोटरी क्लबचे अध्यक्ष चेतन टाटीया, सचिव अर्पित अग्रवाल, प्रकल्प प्रमुख धीरज अग्रवाल आदींसह रोटरी क्लबचे सदस्य एम.डब्ल्यू.पाटील, विलास पी.पाटील, इंजि.विलास एस.पाटील, नितीन अहिरराव, पंकज बोरोले, विपुल छाजेड, पवन गुजराथी, प्राचार्य डाॅ.ईश्वर सौंदाणकर, धीरेंद्र जैन, अनिल अग्रवाल, अनुराग चौधरी, रोटरॅक्ट क्लबचे अध्यक्ष अनिल बाविस्कर आदी मान्यवर उपस्थित होते.

शिक्षकांमधून प्रातिनिधिक स्वरूपात महात्मा गांधी माध्यमिक विद्यालयातील क्रिडा शिक्षक दिनेश बाविस्कर यांनी मनोगत व्यक्त करून या स्तुत्य तथा सेवाभावी उपक्रमाबद्दल रोटरी क्लबचे आभार मानले, तसेच गरजू व होतकरू विद्यार्थ्यांना सायकल प्राप्त झाल्याने त्यांचा चेहर्‍यावर हसु फुलले.

कार्यक्रमाचे प्रास्ताविक व सूत्रसंचालन रोटरॅक्ट क्लबचे अध्यक्ष अनिल बाविस्कर यांनी केले तर रोटरी क्लबचे सचिव अर्पित अग्रवाल यांनी आभार मानले,कार्यक्रमाला विद्यार्थ्यांसह पालक, शिक्षकवृंद व रोटरीचे पदाधिकारी उपस्थित होते.


*रोटरी क्लब तर्फे सायकल प्राप्त विद्यार्थी* - 

*पंकज माध्यमिक विद्यालय, चोपडा* -

१) रितीका नंदकुमार पाटील 

*विवेकानंद माध्यमिक विद्यालय, चोपडा* -

१) राधेश्याम नरेंद्र देशमुख 

*विवेकानंद इंग्लिश मीडियम स्कूल, चोपडा* -

१) अन्वी हर्षल शाह

*महात्मा गांधी माध्यमिक विद्यालय, चोपडा* -

१) चारूशिला उमेश चौधरी

२) अश्विनी मुकेश पाटील 

३) पवन संजय कोळी

*जय श्री दादाजी हायस्कूल, तांदलवाडी*

१) योगिता गजानन बाविस्कर

२) मयुरी राजेंद्र बाविस्कर 

*आदीवासी आश्रमशाळा, सनपुले*

१) झिंगली छगन भिलाला

२) दिशा भुषण पाटील 

३) शर्मिला प्रताप बारेला

*जिल्हा परीषद शाळा, गौर्‍यापाडा* 

१) सागर पठान पावरा

२) करण आमशा पावरा

 *जि प उच्च प्राथमिक शाळा कोळंबा* 

1)कावेरी बापू रायसिंग

2)मानसी सुनील बाविस्कर

3)सृष्टी संदीप कोळी

Post a Comment

थोडे नवीन जरा जुने