८०० गुणवंत विद्यार्थी व १५ क्लासेस शिक्षकांचा भव्य सन्मान संपन्न

 ८०० गुणवंत विद्यार्थी व १५ क्लासेस शिक्षकांचा भव्य सन्मान संपन्न !

 ♦️कोचिंग क्लासेस संचालक संघटनेचा उपक्रम 

नाशिक दि.२०(प्रतिनिधी): येथील नाशिक जिल्हा कोचिंग क्लासेस संचालक संघटना पीसीसीडीए यांच्यातर्फे आज शहर व जिल्ह्यातील प्रत्येक क्लासमधील प्रत्येकी पाच,  दहावी व बारावीच्या गुणवंत अशा ८०० विद्यार्थ्यांचा तसेच अनेक वर्षांपासून अध्यापन व सामाजिक कार्य करणाऱ्या पंधरा यशस्वी शिक्षकांचा " दि बेस्ट कोचिंग टिचर्स अवॉर्ड " प्रदान करुन सन्मान करण्यात आला. 

कालिदास कलामंदिर येथे संपन्न झालेल्या या कार्यक्रमास संदिप युनिव्हर्सिटीचे आरिफ मन्सुरी, आत्मिया ग्लोबल एज्युकेशनचे रोहीत गोकाणी, उपाध्ये क्लासेसचे रमेश उपाध्ये, तोतलेज् कॉमर्स अकॅडमीचे सीए समीर तोतले, पीटीएचे माजी राज्याध्यक्ष शिवाजीराव कांडेकर हे प्रमुख अतिथी म्हणून उपस्थित होते. प्रास्ताविक संघटनेचे अध्यक्ष जयंत मुळे यांनी केले तर सुत्रसंचलन उपाध्यक्ष विवेक भोर, अशोक देशपांडे यांनी केले. 

यावेळीअण्णासाहेब नरुटे, रविंद्र पाटील, मुकुंद रनाळकर, पवन जोशी, विद्या राकडे, प्रतिभा देवरे, रोहीणी भामरे, माधवी चिंतामणी, आरती खाबिया-जैन, वाल्मिक सानप, सचिन जाधव, दिपक गुप्ता, गणेश कोतकर, सुनील आहेर, उमादेवी जितेंद्र विश्वकर्मा, यशवंत भामरे, विक्रमराजे गोसावी, लोकेश पारख, सुनील सोळंकी, किशोर सपकाळे, योगेश बाहेती आदी पदाधिकारी उपस्थित होते. 

🌹यांचा झाला सन्मान🌹

कांता घाडगे, गौरी जोशी, त्रिकुला महेश थोरात, लिना ठाकरे, सोनाली आहेर, धनंजय शिंदे, सचिन शिंदे, प्रवीण गडाख, तेजस बुचके, विक्रांत राजगुरू, उर्वेश सोमय्या, स्वप्नील कदम.



Post a Comment

थोडे नवीन जरा जुने