वर्ल्ड व्हिजन इंडिया सेवा भावी संस्था कडून पर्यावरण दिन साजरा

 वर्ल्ड व्हिजन इंडिया  सेवा भावी संस्था कडून  पर्यावरण दिन साजरा


धरणगाव दि.१०(प्रतिनिधी): दिनांक ११ जुन २०२४ रोजी वर्ल्ड व्हिजन इंडिया कडून पर्यावरण दिन संपूर्ण  धरणगाव  तालुक्यात साजरा आला .  मागील सप्ताहा भर हा  पर्यावरण  दिन ५ जुन ते ११ जून २०२४ रोजी साजरा करण्यात  आला   या संपूर्ण सप्ताहा मध्ये एकूण २३ गावात जनजागृती  करण्यात आली . या पर्यावरण सप्ताहा   मध्ये मुलांनी चित्रकला स्पर्धा ,पर्यावरण दिन , मनोगत , निबन्ध स्पर्धा , रॅली  व झाडे लावून तालुक्यात जनजागृती करण्यात आली . पर्यावरण किती महत्वाचा आहे व आपल्या प्रत्येकाची जबाबदारी आहे , हे या पर्यावरण सप्ताहा मध्ये एकूण २३ गावात हा संदेश देण्यात आला . तसेच २३ गावातील ५० बाल गट मुलांनी या पर्यावरण दिन साजरा करण्यास सहभाग घेतला


जांभोरे या ठिकाणी दिनांक ११ जून २०२४ रोजी सांगता करण्यात आला . या वेळी वर्ल्ड व्हिजन इंडिया  सेवा भावी   संस्थेचे  प्रकल्प अधिकारी जितेंद्र गोरे यांनी मुलांना मार्ग दर्शन केले, प्रत्येक कुटूबाने एक तरी झाडे लावले पाहिजे व पर्यावरणाची जोपासना केली पाहिजे असे मार्ग दर्शन केले .  जांभोरे गावाचे ग्रामस्थ व ग्राम पंचायत सदस्य उपस्थित होते ते. तसेच वर्ल्ड व्हिजन इंडिया चे कर्मचारी रतिलाल वळवी , विजेश पवार, निखिल कुमार सिंग , स्वयंम सेवक आरती पाटील , जांभोरे गावातील ग्रा. प . सदस्य  नानाभाऊ आहिरे , आनंद पवार महाराज जांभोरे ,अंगणवाडी सेविका शिला पवार , सुगंधाबाई पवार आदी  मान्यवर उपस्थित होते.


Post a Comment

थोडे नवीन जरा जुने