चोपडा महाविद्यालयाचा विद्यार्थी निखिल अहिरे यास संशोधन लेखनासाठी प्रथम पुरस्काराचे पारितोषिक जाहीर

  चोपडा महाविद्यालयाचा विद्यार्थी निखिल अहिरे यास   संशोधन लेखनासाठी प्रथम पुरस्काराचे पारितोषिक जाहीर

 चोपडा दि.२६(प्रतिनिधी): सन 1992 मध्ये महात्मा गांधी शिक्षण मंडळ संचलीत औषधनिर्माणशास्र महाविद्यालयाची स्थापना करण्यात आली आहे.  तालुक्यातील एनबीए (NBA) व आय एस ओ (ISO) प्रमाणित महाविद्यालय आहे. बी. फार्म अभ्यासक्रमासाठी प्रवेश क्षमता 100 जागांची आहे तसेच एम. फार्म फार्माकॉग्नोसी पदव्युत्तर पदवी अभ्यासक्रम यासाठी 10 जागांची क्षमता आहे व एम. फार्म फार्मास्युटिक्स या पदव्युत्तर पदवी अभ्यासक्रम यासाठी 12 जागांची क्षमता आहे. पी.एच. डी अभ्यासक्रम  पण महवियालयात सुरू आहे. वर्ष 2020 यावर्षीपासून डिप्लोमा इन फार्मसी (D. Pharm) हा अभ्यासक्रम सुरू करण्यात आला आहे  विद्यार्थ्यांच्या कलागुणांना वाव मिळावा व त्यांचा सर्वांगीण विकास व्हावा यासाठी दरवर्षी प्राचार्य डॉ. गौतम पी वडनेरे यांच्या मार्गदर्शनाखाली *वर्षग्रंथ* या नावाने महाविद्यालयाचे नियतकालिक छापण्यात येते. महाविद्यालयाच्या वर्षग्रंथ -2022-2023 या नियतकालिकेतील हिंदी भाषेतील"आर्टिफिशियल  इंनट्यालिजन्स  क्या है,? " या संशोधन लेखनासाठी   तृतीय वर्ष बी. फार्म चा वियार्थी निखिल अहिरे याला कवयित्री  बहीणाबाई चौधरी  उत्तर महाराष्ट्र विद्यापीठ जळगाव आयोजीत नियतकालिक स्पर्धेत प्रथम क्रमांकाचे पारितोषिक मिळालेले आहे. 

महाविद्यालयात दिनांक 25 मे 2024 रोजी निखिल अहिरे या विद्यार्थ्यांचा महात्मा गांधी शिक्षण संस्थेचे अध्यक्ष अँड संदीप सुरेश पाटिल व सचिव डॉ. स्मिताताई संदीप पाटील यांच्या हस्ते सत्कार करण्यात आला. कार्यक्रमाच्याअध्यक्षीय मनोगताद्वारे संस्थेचे अध्यक्ष अँड. संदीप सुरेश पाटील यांनी विद्यार्थ्यांच्या यशाचे कौतुक व अभिनंदन केले. प्राचार्य डॉ. गौतम पी वडनेरे यांनी महाविद्यालय हे विद्यार्थ्यांच्या सर्वांगीण विकास व प्रगतीसाठी सदैव केंद्रीत आहे व त्याप्रमाणे त्यानां वेळोवेळी शिक्षकांकडून मार्गदर्शन लाभते असे  सांगितले. सदरहू विद्यार्थ्याला प्राचार्य डॉ. गौतम पी वडनेरे,  मुख्य संपादिका प्रा.डॉ. सुवर्णलता एस. महाजन यांचे मार्गदर्शन मिळाले. संस्थेच्या उपाध्यक्षा श्रीमती आशाताई पाटिल, महाविद्यालयाचे प्रबंधक श्री प्रफुल्ल  मोरे, सर्व  शिक्षक, शिक्षकेतर कर्मचारी व संपादकीय टिम या सर्वानी प्रथम क्रमांकाचे पारितोषिक विजेता निखिल अहिरे या  विद्यार्थ्यांचे कौतुक व अभिनंदन केले.

Post a Comment

थोडे नवीन जरा जुने