प्रताप विद्या मंदिराची उज्वल यशाची परंपरा कायम.. ♦️विज्ञान ,वाणिज्य, व्होकेशनल १००℅ तर कला ८८.८८℅



 प्रताप विद्या मंदिराची उज्वल यशाची परंपरा कायम..

♦️विज्ञान ,वाणिज्य, व्होकेशनल १००℅ तर कला ८८.८८

चोपडा  दि.२१(प्रतिनिधी )चोपडा एज्युकेशन सोसायटी संचलित प्रताप विद्या मंदिराच्या विद्यार्थ्यांनी फेब्रुवारी २०२४ इ.१२वी च्या परीक्षेत *कॉपीमुक्त वातावरणात* घवघवीत यश संपादन करून शाळेची उज्वल यशाची परंपरा कायम राखली आहे. शाळेचा  विज्ञान शाखेचा निकाल 100 % लागला असून  तडवी जिया जावेद ८४.३३ ℅ गुण मिळवून विज्ञान शाखेत प्रथम तर मोरे जान्हवी चंद्रकांत ८२.३३℅ द्वितीय व बडगुजर तुषार संदीप ८२.१७℅ तृतीय क्रमांक पटकावून यश संपादन केले . वाणिज्य (कॉमर्स) विभागाचा निकाल देखील 100% लागलेला आहे. यात जयस्वाल याशिका सिद्धेश ८६.५०℅ प्रथम ,अग्रवाल यश विशाल ८५.८३℅ द्वितीय तसेच वैद्य भाग्यश्री तुषार ८४.६७℅ तृतीय क्रमांक प्राप्त केला आहे. कला शाखेचा निकाल 88.88% लागला असून त्यात भिल लक्ष्मी सुनील पाटील हिने ८३.६७℅ गुण मिळवून प्रथम येण्याचा मान मिळवला तर पाटील भावेश बारकू यास ८३.५०℅ द्वितीय आणि कोळी भाग्यश्री जितेंद्र ८२.८३℅ गुण मिळवून तृतीय क्रमांकाचे यश संपादन केले आहे. किमान कौशल्य विभागाचा 100℅ (व्होकेशनल MCVC) निकाल लागला असून या विभागातील विद्यार्थ्यांनी उत्तम यश संपादन केले. यात चित्रकथी देवेंद्र विनायक ६३.६७℅ प्रथम तर सोनार प्रणव भरत ५९.३३℅ द्वितीय क्रमांक प्राप्त केलेला आहे

  एच. एस. सी. फेब्रुवारी २०२४ चा प्रताप विद्या मंदिराच्या सर्व विभागांच्या निकालाची एकूण सरासरी टक्केवारी ९५.३३℅ एवढी असून , विशेष प्राविण्यासह २० विद्यार्थी ८०   टक्क्यांपेक्षा जास्त गुण मिळवून यशस्वी झाले आहेत.

        सर्व यशस्वी विद्यार्थ्यांचे संस्थेचे अध्यक्षा शैलाबेन मयूर,  उपाध्यक्ष विश्वनाथजी अग्रवाल ,चेअरमन राजाभाई मयूर, सचिव माधुरीताई मयूर, संस्था संचालक उर्मिलाबेन गुजराथी, चंद्रहासभाई गुजराथी, भूपेंद्र गुजराथी, रमेशकाका जैन, सर्व सदस्य, संस्थेचे समन्वयक गोविंद गुजराथी,प्रशालेचे मुख्याध्यापक पी. एस. गुजराथी, उपमुख्याध्यापक पी. डी. पाटील , उपप्राचार्य जे. एस. शेलार, पर्यवेक्षिका माधुरी पाटील, पर्यवेक्षक एस. एस. पाटील,पर्यवेक्षक ए. एन. भट तसेच  सर्व शाखांचे पदाधिकारी, शिक्षक बंधू भगिनी, कर्मचारी बंधू आदींनी यशस्वी विद्यार्थी व पालकांचे अभिनंदन व कौतुक केले आहे.

Post a Comment

थोडे नवीन जरा जुने