१२वी परिक्षेत चोपडयातून व्यापाऱ्यांच्या गुणी पाल्यांची उत्तुंग भरारी

 

 १२वी परिक्षेत चोपडयातून व्यापाऱ्यांच्या गुणी पाल्यांची उत्तुंग भरारी 

➖➖➖➖➖➖➖➖➖➖➖➖➖➖➖

चोपडा दि.२१(प्रतिनिधी): चोपडा शहरातील काही व्यापारी बांधवांच्या पाल्यांनी १२वी परिक्षेत उत्तुंग यश संपादन केले आहे.त्यांच्या यशाबद्दल त्यांचे सर्वत्र अभिनंदन होत आहे. गुणी विद्यार्थ्यांची परिक्षेतील यशाबद्दल थोडक्यात माहिती...

〰️〰️〰️〰️〰️〰️〰️〰️〰️〰️〰️〰️〰️〰️〰️

अमित प्रविण जैन यांचे बारावीत यश 

चोपडा (प्रतिनिधी) --- येथील गणेश कॉलनीतील रहिवासी प्रविण इंदरचंद जैन यांच्या मोठा मुलगा अमित जैन हा महात्मा गांधी महाविद्यालयातुन  बारावी सायन्स मध्ये 87:33% गुण मिळवून उत्तीर्ण झाला आहे त्याचे तालुक्यातुन सर्वत्र कौतुक होत आहे.

➖➖➖➖➖➖➖➖➖➖➖➖➖➖➖

मिनल जगदीश जैन हिचे बारावीत यश 

चोपडा (प्रतिनिधी) -- येथिल जे.पी.सॅनिटरीचे संचालक जगदीश प्रेमचंद जैन (हातेडकर) यांची मुलगी महात्मा गांधी महाविद्यालयात बारावी कॉमर्स मध्ये 71% गुण मिळवून उतीर्ण झाली आहे .तिचे या यशाबद्दल तालुक्यातुन सर्वत्र कौतुक होत आहे.

➖➖➖➖➖➖➖➖➖➖➖➖➖➖➖

दिशा सुनिल जैन हिचे बारावीत यश 

चोपडा (प्रतिनिधी)--- येथील नवल प्रॉव्हिजन्स चे संचालक व व्यापारी संघटनेचे माजी कार्याध्यक्ष सुनिल भिकमचंद बरडीया यांची धाकटी कन्या हिला बारावी सायन्स मध्ये 75% गुण मिळवून उतीर्ण झाली आहे तिच्या या यशाबद्दल तिचे तालुक्याभरातून कौतुक होत आहे .

➖➖➖➖➖➖➖➖➖➖➖➖

रिया जैन हिचे बारावीत यश....




चोपडा (प्रतिनिधी)-- हातेड येथील कपाशीचे व्यापारी प्रफुल्लदगडूलाल जैन यांची कन्या कु.रिया जैन ही महात्मा गांधी महाविद्यालयात बारवी सायन्स मध्ये 77;50% गुण मिळवून उत्तीर्ण झाली आहे तिच्या या यशाबद्दल तिचे अनेकांनी कौतुक केले आहे.

➖➖➖➖➖➖➖➖➖➖➖➖➖

कशीष बोरा हिचे बारावीत यश....

चोपडा (प्रतिनिधी) --- चहार्डी येथील व्यापारी भवरलाल ताराचंद बोरा यांची कन्या कशीष बोराचोपडा येथील महात्मा गांधी महाविद्यालयात कॉमर्सच्या बारावीत 82; 50% गुण मिळवून उत्तीर्ण झाली आहे तिच्या या यशाबद्दल तिचे सर्वत्र कौतुक होत आहे

➖➖➖➖➖➖➖➖➖➖➖➖➖➖➖➖

दिव्या सुनिल जैन ही कॉमर्स मध्ये प्रथम ...

चोपडा (प्रतिनिधी)--- येथील आझाद चौकातिल जयंत उपहार गृह चे संचालक सुनील जंयतिलाल खिलोसिया  यांची कन्या दिव्या सुनिल जैन हिला महात्मा गांधी महाविद्यालयात कॉमर्स शाखेत 91;17% गुण मिळवून महाविद्यालयात प्रथम क्रमांकाने उत्तीर्ण झाली आहे तिच्या यशाबद्दल तालुक्याभरातून कौतुक होत आहे .

➖➖➖➖➖➖➖➖➖➖➖➖➖➖➖➖➖

Post a Comment

थोडे नवीन जरा जुने