अपक्ष उमेदवार कोमलताई पाटील ह्यांना कोरपावली भागात उत्स्फूर्त पाठिंबा


 अपक्ष उमेदवार कोमलताई पाटील ह्यांना कोरपावली भागात उत्स्फूर्त पाठिंबा 

चोपडा दि.13(प्रतिनिधी)रावेर लोकसभा निवडणुक प्रचाराची रणधुमाळी सुरू झाली असून अपक्ष उमेदवार तथा बीआर एस.कार्यकर्त्या सौ. कोमलताई  पाटील यांनी आपला झंझावात जोरदार सुरू केला आहे.आज यावल तालुक्यात कोरपावली, सांगवी ,भालोद, हाबंर्डी,या गावी भेट दिली असता  त्यांना उत्स्फूर्त  प्रतिसाद मिळत आहे. गावातील प्रमुख व्यक्तीच्या भेटी घेतल्या जोरदार पाठिंबा दर्शविला आहे.यावेळी समाधान बाविस्कर, वर्षा चौधरी ,पमाबाई पानपाटील, ललीत पाटील व तसेच त्या गावाचे सरपंच विलास नारायण आडकमोड अॕडव्हेटेक रियाज पटेल ,हाजी ईस्माईल, ग्रामपचायत सदस्य गफुर नामदार, जलील पटेल ग्रामपचायत सदस्य मेहबुब तळवी, रमजान तळवी, भिमराव ईघाटे ,कलदीर तळवी, आकाश अडकमोल, रुबाब तडवी, मौसिन तळवी, रियाज तडवी भालोद आदी कार्यकर्ते उपस्थित होते.

Post a Comment

थोडे नवीन जरा जुने