अजनाड येथे डॉ.देशमुख नैसर्गिक शेती मिशन अंतर्गत प्रशिक्षण

 अजनाड येथे डॉ.देशमुख नैसर्गिक शेती मिशन अंतर्गत प्रशिक्षण                          

  गणपूर(ता चोपडा)ता १२(प्रतिनिधी): डॉ. पंजाबराव देशमुख नैसर्गिक शेती मिशन योजने अंतर्गत अजनाड(ता शिरपूर)येथे प्रगतिशील शेतकरी कैलास पाटील यांच्या शेतात डॉ पंजाबराव देशमुख नैसर्गिक शेती मिशन अंतर्गत गावपातळी वरील शेतकरी प्रशिक्षण वर्ग आयोजित करण्यात आला.          

   यासाठी शिवारफेरीचे आयोजन करण्यात आले. एक ड्रम थिअरी, जिवामृत , बायोडायनामिक कंम्पोस्ट डेपो लावणे ,दशपर्णी अर्क तयार करणे इत्यादी  बाबत प्रत्यक्ष शेतात प्रात्यक्षिक करून दाखविण्यात आले.  सोलापूर येथील सेंद्रिय शेती करणारे  शेतकरी जगन्नाथ मगर,  खुशालसिंग मोरे,  नितीन वारके सरपंच दरबार जाधव,साक्री येथील दुल्लभ जाधव, जामनेर येथील बापु बेरूळकर , वरखेडी येथील  नरेंद्र जैन यांनी यावेळी मार्गदर्शन केले.तालुका कृषि अधिकारी सी. डी. साठे यांनी प्रास्ताविक केले. मंडळ कृषि अधिकारी  एम. जी.ढोडरे  यांनी सेंद्रिय शेतीबाबत व यानंतर गट समूहाला भविष्यात करावयाच्या उपाय -योजनाबाबत मार्गदर्शन केले. मंडळ कृषि अधिकारी  विशाल मोटे, थाळनेर मंडळातील सर्व कृषी पर्यवेक्षक, कृषि सहाय्यक, बीटीएम प्रज्ञा मोरे व गावातील सेंद्रिय शेती करणारे शेतकरी  उपस्थित होते.निलेश राजपूत यांनी उपस्थितांचे आभार मानले.......

अजनाड(ता शिरपूर) प्रशिक्षणासाठी उपस्थित शेतकरी व अधिकारी

Post a Comment

थोडे नवीन जरा जुने