जे.ई.स्कूलमध्ये १० वी च्या विद्यार्थ्यांना दिला निरोप....

 जे.ई.स्कूलमध्ये १० वी च्या विद्यार्थ्यांना दिला निरोप....

झटपट पोलखोल/मुक्ताईनगर प्रतिनिधी सतीश गायकवाड दि.१२}मुक्ताईनगर तालुका एज्युकेशन सोसायटी संचलित जे ई स्कूल मुक्ताईनगर येथे इ १० वी मध्ये शिकत असणाऱ्या विद्यार्थ्यांचा निरोप समारंभ आयोजित करण्यात आला होता. संस्थेच्या चेअरमन एड. रोहिणी खडसे यांनी विद्यार्थ्यांना भावी वाटचालीसाठी शुभेच्छा दिल्या. 

उपस्थित विद्यार्थी व विद्यार्थिनींनी मनोगतातून शाळा व शिक्षकांप्रती आपल्या भावना व्यक्त केल्या. विद्यार्थ्यांनी स्पर्धेत सहभागी व्हावे स्पर्धाही निकोप असावी. परिश्रमाशिवाय यश मिळत नाही असे कार्यक्रमाचे अध्यक्ष व संस्थेचे सचिव डॉक्टर सी एस चौधरी यांनी आपल्या मनोगतातून विद्यार्थ्यांना मार्गदर्शन केले. प्रमुख पाहुणे म्हणून संस्थाचालक  पुरुषोत्तम भाऊ महाजन, चंद्रशेखर भाऊबढे , मारुती कृष्णा बढे उपस्थित होते. प्राचार्य  आर पी पाटील सर यांनी विद्यार्थ्यांना परीक्षेबाबत महत्त्वाच्या सूचना देऊन कॉपीमुक्त  परीक्षेचे आवाहन केले. आपले आरोग्य सांभाळून भयमुक्त परीक्षेला आपण सामोरे जावे असे आपल्या प्रास्ताविकातून उपप्राचार्य  जे जे पाटील सर यांनी मार्गदर्शन केले. कार्यक्रमाचे सूत्रसंचालन  एस आर ठाकूर सर यांनी केले, कार्यक्रमाच्या यशस्वीतेसाठी पर्यवेक्षक  व्ही डी बऱ्हाटे, एस आर महाजन एस पी राठोड तथा सर्व शिक्षक व शिक्षकेतर बंधू भगिनींनी प्रयत्न केले.

Post a Comment

थोडे नवीन जरा जुने